हत्ती पकडण्याचे कौशल्य पालकमंत्र्यांनी बिबट्याबाबत वापरावे- राम शिंदे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 02:06 PM2020-12-13T14:06:48+5:302020-12-13T14:07:35+5:30

कोल्हापूरमध्ये हत्ती नियंत्रणात ठेवण्याचे कौशल्य वापरणारे पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी ते बिबट्या पकडण्यासाठीही नगर जिल्ह्यात  वापरावे. नगर जिल्ह्यात बिबटे वाढत आहेत हेही राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे षडयंत्र आहे, असा अनोखा आरोप माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे.

Guardian Minister should use the skill of catching elephants with regard to leopards- Ram Shindeहत्ती पकडण्याचे कौशल्य पालकमंत्र्यांनी बिबट्याबाबत वापरावे- राम शिंदे  | हत्ती पकडण्याचे कौशल्य पालकमंत्र्यांनी बिबट्याबाबत वापरावे- राम शिंदे 

हत्ती पकडण्याचे कौशल्य पालकमंत्र्यांनी बिबट्याबाबत वापरावे- राम शिंदे 

Next

अहमदनगर  : कोल्हापूरमध्ये हत्ती नियंत्रणात ठेवण्याचे कौशल्य वापरणारे पालकमंत्री हसन मुश्रिफ यांनी ते बिबट्या पकडण्यासाठीही नगर जिल्ह्यात  वापरावे. नगर जिल्ह्यात बिबटे वाढत आहेत हेही राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे षडयंत्र आहे, असा अनोखा आरोप माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे.

नगर येथील भाजप कार्यालयात रविवारी  केंद्र सरकारच्या कृषी कायद्याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिंदे म्हणाले, ७० वर्षानंतर प्रथमच शेतक-यांना त्यांचा माल कुठे विकावा याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यामुळे शेतकरी ख-या अर्थाने स्वतंत्र झाला आहे. मात्र केवळ राजकारण म्हणून विरोधक कायद्याला विरोध करीत आहेत. कायद्याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत.

कोणाला संपवण्यासाठी हे कायदे नाहीत.  बाजार समितीही स्पर्धेत उतरू शकतात. शेतमालाचा भाव पेरणीपूर्वीच निश्चित होणार आहे. फसवणूक झाली तर कारवाईची तरतूद असून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करता येणार आहे, असे शिंदे म्हणाले.

Web Title: Guardian Minister should use the skill of catching elephants with regard to leopards- Ram Shindeहत्ती पकडण्याचे कौशल्य पालकमंत्र्यांनी बिबट्याबाबत वापरावे- राम शिंदे 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.