सदस्यांच्या गैरहजेरीबाबत गटनेत्या शेंडगेंचे मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:21 AM2021-03-08T04:21:42+5:302021-03-08T04:21:42+5:30

अहमदनगर : स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीदरम्यान सदस्यांच्या गैरहजेरीवरून सेनेत तक्रारवार सुरू असताना गटनेत्या रोहिणी संजय शेंडगे यांनी मात्र ...

Group leader Shendge's silence on members' absence | सदस्यांच्या गैरहजेरीबाबत गटनेत्या शेंडगेंचे मौन

सदस्यांच्या गैरहजेरीबाबत गटनेत्या शेंडगेंचे मौन

Next

अहमदनगर : स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीदरम्यान सदस्यांच्या गैरहजेरीवरून सेनेत तक्रारवार सुरू असताना गटनेत्या रोहिणी संजय शेंडगे यांनी मात्र मौन बाळगले आहे. सेनेच्या गटनेत्यांनी सदस्याबाबत घेतलेल्या या भूमिकेबाबत राजकीय वतुर्ळात चर्चा सुरू आहे.

महापालिकेत शिवसेना क्रमांक एकचा पक्ष आहे. असे असले तरी नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढवली. स्थायी समितीत सेनेचे पाच सदस्य आहेत. असे असताना सभापतीपदासाठी विजय पठारे यांचा अर्ज दाखल करताना प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, शाम नळकांडे हे सेनेचे तीन सदस्य अनुपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाच्या गटनेत्यांना अधिकार असतात. माजी नगरसेवक संजय शेंडगे यांच्या पत्नी रोहिणी शेंडगे सेनेच्या महापालिकेतील गटनेत्या आहेत. भाजपच्या गटनेत्या उपमहापौर मालन ढोणे, बसपाचे मुद्दसर शेख आणि काँग्रेसच्या गटनेतेपदी सुप्रिया धनंजय जाधव यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. सेनेचे गटनेते वगळता इतर सर्व पक्षांचे गटनेते स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत सक्रिय हाेते. अविनाश घुले यांना सभापती करण्यासाठी राष्ट्रवादीचे गटनेते बारस्कर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या निवडणुकीत भाजपच्या गटनेत्या ढोणे, बसपाचे मुद्दसर शेख आणि काँग्रेसच्या गटनेत्या सुप्रिया जाधव हे राष्ट्रवादीसाेबत होते.

सभापती निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस आणि बसपा हे चारही पक्ष सोबत होते. राष्ट्रवादीचे घुले यांच्याविरोधात सेनेचे पठारे यांनी अर्ज दाखल केला होता. सेनेने माघार घेतली असली तरी स्थायी समितीचे सर्व सदस्य सोबत असणे गरजेचे होते. मात्र तिघे जण अनुपस्थित होते. ते अनुपस्थित का राहिले, याचा जाबाब गटनेत्या विचारू शकतात; परंतु त्यांनी याबाबत एक चकार शब्दही काढला नसल्याने अश्चर्य व्यक्त केले जात आहे.

...

मनोज कोतकरांना भाजपचे अभय

चार महिन्यांपूर्वी झालेल्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचे मनोज कोतकर राष्ट्रवादीत गेले. ते राष्ट्रवादीकडून सभापती झाले. भजपचे शहराध्यक्ष महेंद्र गंधे यांनी याबाबत कोतकर यांना लेखी खुलासा करण्याबाबत पत्र दिलेले होते. त्यानंतर कोतकर हे चार महिने सभापती राहिले. त्यांचा सभापती पदाचा कार्यकाळ संपला. चार मिहने उलटूनही कोतकर यांच्यावर भाजपने कारवाई करण्याचे धाडस दाखविले नाही. हे एक प्रकारे भाजपने कोतकर यांना दिलेले अभय असल्याचे बोलले जाते.

Web Title: Group leader Shendge's silence on members' absence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.