वटपौर्णिमेपासून हरित केडगाव मोहिमेस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:16 AM2021-06-25T04:16:45+5:302021-06-25T04:16:45+5:30

केडगाव : केडगाव जागरूक नागरिक मंचच्यावतीने वटपौर्णिमेचे औचित्य साधून समाजसेवक व केडगाव भूषण स्व. एकनाथ पाचारणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केडगाव ...

The green Kedgaon campaign started from Vatpoornime | वटपौर्णिमेपासून हरित केडगाव मोहिमेस सुरुवात

वटपौर्णिमेपासून हरित केडगाव मोहिमेस सुरुवात

Next

केडगाव : केडगाव जागरूक नागरिक मंचच्यावतीने वटपौर्णिमेचे औचित्य साधून समाजसेवक व केडगाव भूषण स्व. एकनाथ पाचारणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ केडगाव साईनगर व माधवनगर भागात हरित केडगाव या वृक्षारोपणाच्या मोहिमेस केडगाव येथील नगरसेवक अमोल येवले, विजय पठारे, संग्राम कोतकर, बबलू शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

यावेळी वड, पिंपळ, कडूलिंब, करंज, गुलमोहर असे विविध पर्यावरण स्नेही वृक्ष लागवड व त्यास जाळीचे संरक्षण करण्यात आले. मंच यापुढे दर रविवारी केडगावातील विविध भागात १० वृक्षांची लागवड करणार आहे. त्याची जबाबदारी नागरिकांकडे देण्यात येणार आहे. मंचाचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी वडाचे महत्त्व सांगितले. नगरसेवक अमोल येवले, संग्राम कोतकर, विजय पठारे, बबलू शिंदे यांनी या मोहिमेस सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जनहित फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव कदम, मंचाचे सदस्य मेजर बोरकर, मेजर उरमुडे, माधव कुलकर्णी, गणेश वाघमारे, प्रवीण पाटसकर, विशाल सकट, अतुल लवांडे, गणेश लोळगे आदी उपस्थित होते.

Web Title: The green Kedgaon campaign started from Vatpoornime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.