Gold lass for cheap: one lakh rupees | स्वस्तात सोन्याचे आमिष : एक लाख रुपयांना लुटले
स्वस्तात सोन्याचे आमिष : एक लाख रुपयांना लुटले

अहमदनगर : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून पालघर येथील चौघा भामट्यांनी मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्याला नगर येथे बोलावून त्यांचे एक लाख रुपये लुटले़ नगर-दौंड रोडवरील हॉटेल सुरजच्या पाठीमागे मंगळवारी रात्री दहा वाजता ही घटना घडली़ याप्रकरणी सखाराम पांडुरंग उंबरे (वय ३० रा़ मुंबई) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़
याप्रकरणी पोलिसांनी ढवळ्या शिडा डोबा, मधू लहानू बागुल, सुरेश लक्ष्मण कलिंगड व रमेश (पूर्ण नाव माहित नाही रा़ सर्व रा़ जव्हार जि़ पालघर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ सखाराम उंबरे हे मुंबई महापालिकेत कक्ष परिचर म्हणून कार्यरत आहेत़ पालघरच्या चौघा चोरट्यांनी त्यांना आमच्याकडे खूप सोने असून कमी पैशांत तुम्हाला सोने देतो असे सांगत त्यांच्याकडून १ लाख रुपये व ८ हजार रुपयांचा मोबाईल घेतला़ उंबरे हे सोने घेण्यासाठी नगरमध्ये आले तेव्हा त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले़ याबाबत सहायक निरीक्षक गिरीश सोनवणे हे पुढील तपास करत आहेत़

Web Title: Gold lass for cheap: one lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.