पुढील दोन वर्षात गोधेगावात एकाही मुलाला जन्म देणार नाही; कोरोनामुळे शंभर जोडप्यांचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 12:20 PM2020-06-02T12:20:23+5:302020-06-02T13:03:38+5:30

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील जवळपास शंभर नवविवाहित व तरुण जोडप्यांनी पुढील दोन वर्ष एकही मूल जन्माला न घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे, अशी माहिती सरपंच अशोक भोकरे यांनी ‘लोकमत’ला दिली. असा निर्णय घेणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच गाव असावे.

Godhegaon will not give birth to any child in the next two years; The determination of a hundred couples by corona | पुढील दोन वर्षात गोधेगावात एकाही मुलाला जन्म देणार नाही; कोरोनामुळे शंभर जोडप्यांचा निर्धार

पुढील दोन वर्षात गोधेगावात एकाही मुलाला जन्म देणार नाही; कोरोनामुळे शंभर जोडप्यांचा निर्धार

Next

रोहित टेके  /  
कोपरगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील जवळपास शंभर नवविवाहित व तरुण जोडप्यांनी पुढील दोन वर्ष एकही मूल जन्माला न घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे, अशी माहिती सरपंच अशोक भोकरे यांनी ‘लोकमत’ला दिली. असा निर्णय घेणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच गाव असावे.

 गोधेगावची लोकसंख्या तीन हजाराच्या आसपास आहे. या गावात २०१९ या वर्षात व यंदाच्या मे अखेर जवळपास १०० तरुणांचे विवाह झाले आहेत. नवीन विवाह झाला की घरात पाळणा हलण्याचे वेध कुटुंबीयांसह नातेवाईकांना लागतात. यंदा मात्र फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. त्याचे लोण थेट ग्रामीण भागातही पसरले आहे.

 रविवारी ममदापूर (ता़राहाता) येथील तरुण कोरोनाबाधित आढळला. या तरुणाचा संपर्क गोधेगाव येथील त्याच्या मामाच्या कुटुंबाशी आला. त्यामुळे एकाच कुटुंबातील ८ व्यक्तींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले. त्यामुळे गोधेगावचे सरपंच अशोक भोकरे यांनी तातडीने सोमवारी (दि.१ जून) कोरोनाच्या उपाययोजना व प्रतिबंध करण्यासाठी ग्रामस्थांची फिजिकल डिस्टन्सिंगने विशेष ग्रामसभा घेतली. या सभेत विविध निर्णय घेण्यात आले. 

गावातील नवविवाहित जोडपे व तरुण जोडप्यांना सभेत आवाहन करण्यात आले. २०२० व २०२१ या दोन वर्षात आपल्या गावात आपण एकही अपत्य जन्माला घालू नये. कारण यापुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव कसा राहील हे सांगता येणार नाही. त्यामुळे गरोदर महिलांना उपचारापासून तर प्रसूतीपर्यंत खूप काळजी घ्यावी लागेल. यातून मातेला व जन्माला आलेल्या बाळाला धोका निर्माण होऊ शकतो. ही गंभीर बाब लक्षात घेता नवविवाहितांनी या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामपंचायतीच्या निर्णयाप्रमाणे कोरोनाचा प्रभाव दूर होईपर्यंत अपत्य जन्मास न घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच अशोक भोकरे यांनी सांगितले.

कोरोनाच्या संकटकाळात गरोदर मातेला वेळेत उपचार मिळाला नाही तर मातेच्या व बाळाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मागील आठवड्यात नगर येथील कोरोनाबाधित महिलेने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आणि दुस-या दिवशीच तिचा मृत्यू झाला. अशी वेळ आपल्या गावातील कुणावरच येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
                                                                                     -अशोक भोकरे, सरपंच, गोधेगाव, ता. कोपरगाव.

Web Title: Godhegaon will not give birth to any child in the next two years; The determination of a hundred couples by corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.