सिद्धटेक भक्तनिवासाची चौथ्यांदा निविदा प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:19 AM2021-07-25T04:19:46+5:302021-07-25T04:19:46+5:30

सिद्धटेक : सिद्धटेक (ता. कर्जत) येथील शासकीय भक्तनिवासाची तिसरी निविदा प्रक्रिया रद्द झाल्यानंतर गुरुवारी (दि. २२) ‘लोकमत’ने याबाबत वृत्त ...

Fourth tender process for Siddhatek Bhaktanivasa | सिद्धटेक भक्तनिवासाची चौथ्यांदा निविदा प्रक्रिया

सिद्धटेक भक्तनिवासाची चौथ्यांदा निविदा प्रक्रिया

Next

सिद्धटेक : सिद्धटेक (ता. कर्जत) येथील शासकीय भक्तनिवासाची तिसरी निविदा प्रक्रिया रद्द झाल्यानंतर गुरुवारी (दि. २२) ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच चौथ्यांदा निविदा प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेत आता जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.

साडेतीन वर्षांपासून बंद असलेली कोट्यवधी रुपयांच्या वास्तूची दुरवस्था होत आहे. ‘लोकमत’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर तत्काळ दुसऱ्या दिवशी शुक्रवारी भक्त निवास, बहुउद्देशीय सभागृह, आदी वास्तू भाडेतत्त्वावर देण्याची चौथी निविदा काढली. पूर्वीचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सिद्धटेकला भेट देऊनही त्यांना ही वास्तू सुरू करण्यात यश आले नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ३० नोव्हेंबरला सिद्धटेकला भेट देऊन जम्बो बैठक घेतली. परंतु, त्यांनाही हे भक्तनिवास सुरू करण्यात अद्याप यश आलेले नाही. चौथ्या निविदेत तरी वास्तू सुरू होण्यास यशस्वी होतात की नाही हे काळच ठरवेल.

अष्टविनायकांपैकी एक सिद्धटेक हे भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे. दर दिवशी हजारो भाविक या ठिकाणी भेट देत असतात. परंतु, दौंड-पुणे येथे निवासासाठी चांगली व्यवस्था असल्याने बरेच भाविक तिकडेच थांबण्यास प्राधान्य देतात.

सिद्धटेक येथील भक्त निवास, बहुउद्देशीय सभागृह, व्यापारी गाळे आदी वास्तू सुरू झाल्यास भाविक सिद्धटेक येथे थांबू शकतात. त्यामुळे शासकीय महसुलासह स्थानिक बाजारपेठेसही उर्जितावस्था येईल. यासाठी वरील वास्तू सुरू होणे आवश्यक आहे.

------

भाडेतत्त्वाबाबतच्या दराचा विचार व्हावा...

ग्रामीण भाग, या वास्तूविषयी शासनाचे असलेले धरसोडीचे धोरण, वास्तूचे झालेले निकृष्ट काम, ठेक्याचा असलेला कमी कालावधी, पायभूत जास्त दराची बोली यामुळे ठेकेदार ठेका घेण्यास तयार नाहीत. प्रशासन मात्र शहरी दराने या वास्तू भाडेतत्त्वावर देण्याबाबत अडून बसले आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया वेळोवेळी रद्द होत आहे.

यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने ग्रामीण भागाचा व भाविकांना सेवा देण्याचा विचार करता ठेक्याची मुदत पाच वर्षांसाठी व कमी दराने देऊन कोट्यवधीच्या वास्तूची दुरवस्था टाळावी, अशी भावना भाविकांमध्ये आहे.

---

२४सिद्धटेक

सिद्धटेक येथील बंद अवस्थेतील भक्तनिवास.

Web Title: Fourth tender process for Siddhatek Bhaktanivasa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.