फसवणूकप्रकरणी तलाठ्यासह चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 04:14 PM2019-08-25T16:14:36+5:302019-08-25T16:16:08+5:30

इतर वारसांचे नावे लपवून खोटे प्रतिज्ञापत्र तयार करत सातबारा उताऱ्यावर मालमत्तेची नोंद केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तत्कालीन कामगार तलाठ्यासह चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Four convicted of fraud with fraud | फसवणूकप्रकरणी तलाठ्यासह चौघांवर गुन्हा

फसवणूकप्रकरणी तलाठ्यासह चौघांवर गुन्हा

Next

अहमदनगर : इतर वारसांचे नावे लपवून खोटे प्रतिज्ञापत्र तयार करत सातबारा उताऱ्यावर मालमत्तेची नोंद केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तत्कालीन कामगार तलाठ्यासह चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
५ आॅक्टोबर २०१८ रोजी नवनागापूर तलाठी कार्यालयात हा प्रकार घडला़ याप्रकरणी शांतवन गेणू गायकवाड (वय ६० रा़ मुकुंदनगर) यांनी २३ आॅगस्ट रोजी फिर्याद दाखल केली आहे़ पोलिसांनी अनिता राजेंद्र गायकवाड, आनंद राजेंद्र गायकवाड, किसन राहुल भिंगारदिवे व तत्कालीन कामगार तलाठी अभिजित मनोहर खटवकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे़ खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून तलाठी कार्यालयात अनिता गायकवाड व आनंद गायकवाड यांची सातबाराच्या उताºयावर नोंद लावली़ याबाबत शांतवन गायकवाड यांनी आरोपींना विचारणा केली तेव्हा ते म्हणाले आम्ही तलाठी खटावकर व तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पैसे देऊन विकत घेतले आहे़ तुम्ही काही लुडबुड केली तर जिवे मारुन टाकू अशी धमकी दिली, असे या फिर्यादीत म्हटले आहे़ याप्रकरणी पोलीस हवालदार पवार हे पुढील तपास करत आहेत़

Web Title: Four convicted of fraud with fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.