बु-हाणनगर ग्रामपंचायतीत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची एकहाती सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 02:00 PM2021-01-18T14:00:14+5:302021-01-18T14:01:17+5:30

नगर तालुक्यातील बु-हाणनगर ग्रामपंचायतीत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या गटाने सत्ता कायम राखली आहे. १५ पैकी १५ जागा जिंकून कर्डिले गटाने बहुमत मिळविले आहे.

Former Minister Shivaji Kardile's one-sided rule in Bu-Hannagar Gram Panchayat | बु-हाणनगर ग्रामपंचायतीत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची एकहाती सत्ता

बु-हाणनगर ग्रामपंचायतीत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांची एकहाती सत्ता

Next

अहमदनगर :  नगर तालुक्यातील बु-हाणनगर ग्रामपंचायतीत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या गटाने सत्ता कायम राखली आहे. १५ पैकी १५ जागा जिंकून कर्डिले गटाने बहुमत मिळविले आहे.

बु-हाणनगर ग्रामपंचायतीत १५ जागांसाठी निवडणूक झाली. त्यातील ८ जागा बिनविरोध झाली होती. ७ जागांसाठी निवडणूक झाली होती.

कर्डिले गटाविरोधात महाविकास आघाडीने पॅनल उभा केला होता. मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे अमोल जाधव, रोहिदास कर्डिले गटाने त्यांना आव्हान दिले होते. परंतु ८ जागा कर्डिले यांनी बिनविरोध करीत आधीच राखल्या होत्या. ७ जागांवर निवडणूक लढवून त्याही कर्डिले गटाने जिंकल्या. त्यामुळे कर्डिले गटाने बु-हाणनगर ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता मिळविली आहे.

 

 

 

Web Title: Former Minister Shivaji Kardile's one-sided rule in Bu-Hannagar Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.