महाराष्ट्र बचाव आंदोलनात माजीमंत्री राम शिंदे कुटुंबीयांसह सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 11:50 AM2020-05-22T11:50:29+5:302020-05-22T11:51:17+5:30

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे. याप्रश्नी भाजपने राज्यभर पुकारलेल्या महाराष्ट्रात बचाव आंदोलनात माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कुटुंबीयांसह चोंडी येथील घरासमोर शुक्रवारी (दि.२२ मे) सहभाग घेतला.

Former Minister Ram Shinde participates in the Maharashtra Bachao Andolan with his family | महाराष्ट्र बचाव आंदोलनात माजीमंत्री राम शिंदे कुटुंबीयांसह सहभागी

महाराष्ट्र बचाव आंदोलनात माजीमंत्री राम शिंदे कुटुंबीयांसह सहभागी

Next

जामखेड : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरले आहे. याप्रश्नी भाजपने राज्यभर पुकारलेल्या महाराष्ट्रात बचाव आंदोलनात माजीमंत्री प्रा. राम शिंदे यांनी कुटुंबीयांसह चोंडी येथील घरासमोर शुक्रवारी (दि.२२ मे) सहभाग घेतला.
 कोवीड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजन व समन्वयात पूर्णपणे अभाव राहिला आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार कोवीड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरले आहे. याप्रश्नी राज्य सरकारला धारेवर धरण्यासाठी भाजपतर्फे महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान जामखेड तालुक्यातील चोंडी येथील घरासमोर माजीमंत्री प्रा.राम शिंदे, त्यांच्या पत्नी, माजी सभापती आशाताई राम शिंदे, चिरंजीव अजिंक्य, चोंडीचे  सरपंच अभिमन्यू सोनवणे, चोंडी सेवा संस्थेचे अध्यक्ष विलास जगदाळे, उपसरपंच पांडुरंग उबाळे आदी यावेळी उपस्थित होते.
 

Web Title: Former Minister Ram Shinde participates in the Maharashtra Bachao Andolan with his family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.