राहुरीत लॉकडाऊनचा पहिला बळी; रोजगार नसल्याच्या नैराश्यातून मजुराने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:36 PM2020-05-29T17:36:54+5:302020-05-29T17:37:33+5:30

राहुरी : लॉकडाऊनच्या काळात हाताल काम नसल्याने उपासमारीची वेळ आली. यातून नैराश्य आलेल्या राहुरी येथील ३५ वर्षीय खाणकाम करणा-या बाळू गुंजाळ या मजूर तरूणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना राहुरी परिसरात २९ मे रोजी उघडकीस आली आहे. 

   First victim of lockdown in Rahuri; The laborer committed suicide due to depression due to lack of employment | राहुरीत लॉकडाऊनचा पहिला बळी; रोजगार नसल्याच्या नैराश्यातून मजुराने केली आत्महत्या

राहुरीत लॉकडाऊनचा पहिला बळी; रोजगार नसल्याच्या नैराश्यातून मजुराने केली आत्महत्या

Next

राहुरी : लॉकडाऊनच्या काळात हाताल काम नसल्याने उपासमारीची वेळ आली. यातून नैराश्य आलेल्या राहुरी येथील ३५ वर्षीय खाणकाम करणा-या बाळू गुंजाळ या मजूर तरूणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना राहुरी परिसरात २९ मे रोजी उघडकीस आली आहे. 

 बाळू रामभाऊ गुंजाळ (रा.मुलनमाथा, राहुरी) येथे रहात होता. सदर तरूण हा खाणकाम करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होता. गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोना लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणा-या नागरिकांना रोजगार नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याच नैराश्यातून बाळू गुंजाळ याने आत्महत्या केल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. गुंजाळ याच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, वडील असा परिवार आहे. या कुटुंबाची उपजिवीका त्यांच्यावरच होती. 

 या घटनेबाबत राहुरी पोलिसांत कैलास रामभाऊ गुंजाळ याच्या फिर्यादीवरून आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुशांत दिवटे हे करीत आहेत.
 
Web Title:    First victim of lockdown in Rahuri; The laborer committed suicide due to depression due to lack of employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.