पहिल्याच दिवशी साडेचारशे जणांना कोरोना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:24 AM2021-03-09T04:24:35+5:302021-03-09T04:24:35+5:30

नेवासा : नेवासा तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिल्याच दिवशी ४५२ लसीकरण करण्यात आले. या अगोदर आरोग्यसेवक, कर्मचारी ...

On the first day alone, four and a half hundred people were vaccinated against corona | पहिल्याच दिवशी साडेचारशे जणांना कोरोना लस

पहिल्याच दिवशी साडेचारशे जणांना कोरोना लस

Next

नेवासा : नेवासा तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रात पहिल्याच दिवशी ४५२ लसीकरण करण्यात आले.

या अगोदर आरोग्यसेवक, कर्मचारी व आशा सेविका अशा एक हजार जणांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.

सोमवारी पहिल्या दिवशी तालुक्यातील नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अनुक्रमे चांदा ३०, कुकाणा ४४, नेवासा बुद्रूक ३२, नेवासा खुर्द ७६, सलाबतपूर २०, शिरसगाव ९७, सोनई २७, टोका ७१ व उस्थळ प्राथमिक आरोग्य केंद्रात ५२ जणांना लसीकरण करण्यात आले. याशिवाय नेवासा फाट्यावरील ग्रामीण रुग्णालयात सोमवार अखेर एक हजार लोकांचे लसीकरण झालेले आहे.

आजच्या मोठ्या लसीकरण मोहिमेमध्ये लसीकरण केलेल्या कोणत्याही रुग्णाला कोणत्याही प्रकारची रिॲक्शन आली नाही. लस घेतल्यानंतर प्रत्येक लाभार्थ्याला अर्धा तास दवाखान्यातच निगराणीखाली ठेवले जाते, असे वैद्यकीय अधिकारी योगेश साळुंके यांनी सांगितले.

Web Title: On the first day alone, four and a half hundred people were vaccinated against corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.