Fighting in two groups at Rahuri factory; Seven people were injured | राहुरी फॅक्टरी येथे दोन गटात हाणामारी; सात जण जखमी 

राहुरी फॅक्टरी येथे दोन गटात हाणामारी; सात जण जखमी 

राहुरी : राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे मोटरसायकलवर कट मारल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटातील सहा ते सात जण गंभीर जखमी झाले आहे. घटनेबाबत राहुरी पोलिसांत दोन्ही गटाने परस्पर विरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

शुक्रवार (दि.५) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास राहुरी फॅक्टरी येथील प्रसाद नगर परिसरात मोटरसायकलवर कट मारल्याच्या कारणांवरून एका गटातील इस्माईल रमजू शेख, आलीम हमीद शेख, सोहेल इस्माईल शेख तसेच दुस-या गटातील गोरक्ष बाळासाहेब नरोडे, दादासाहेब सुधाकर लोखंडे, पंकज बाळासाहेब त्रिभूवन या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. 

सोहेल ईस्माईल शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोरक्ष बाळासाहेब नरोडे, दादासाहेब सुधाकर लोखंडे आणि पंकज बाळासाहेब त्रिभूवन या तिघांविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल हे करीत आहे. 

दुसरा गुन्हा दादासाहेब सुधाकर लोखंडे यांच्या फिर्यादीवरून इस्माईल रमजू शेख, आलीम हमीद शेख आणि सोहेल ईस्माईल शेख या तिघांविरोधात जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके हे करीत आहेत.

Web Title: Fighting in two groups at Rahuri factory; Seven people were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.