साईनगरीत पन्नास खाटांचे कोवीड हॉस्पीटल सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 02:52 PM2020-09-11T14:52:38+5:302020-09-11T14:53:26+5:30

सेंट्रल ऑक्सीजन सुविधेसह राहाता तालुक्तायातील सर्वात अद्यावत असलेले व गोरगरीब रूग्णांसाठी वरदान ठरू शकणारे साईनगरीतील पन्नास खाटांचे कोवीड हॉस्पीटल शुक्रवारपासुन रूग्णांच्या सेवेत दाखल झाले.

Fifty-bed Kovid Hospital started in Sainagari | साईनगरीत पन्नास खाटांचे कोवीड हॉस्पीटल सुरु

साईनगरीत पन्नास खाटांचे कोवीड हॉस्पीटल सुरु

Next

शिर्डी : सेंट्रल ऑक्सीजन सुविधेसह राहाता तालुक्तायातील सर्वात अद्यावत असलेले व गोरगरीब रूग्णांसाठी वरदान ठरू शकणारे साईनगरीतील पन्नास खाटांचे कोवीड हॉस्पीटल शुक्रवारपासुन रूग्णांच्या सेवेत दाखल झाले.
रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असुन तालुक्यातील अत्यवस्थ रूग्णांवरही येथेच उपचार होणार असल्याने गोरगरीब रूग्णांना मोठा आधार मिळणार आहे. या हॉस्पीटलच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली ऑक्सीजन पाईपलाईन, व्हॅक्युम व कॉम्प्रेसरची व्यवस्था उभी करण्यासाठी आमदार राधाकृष्ण विखे यांनी आमदार निधीतून तातडीने बारा लाखांची मदत उपलब्ध करून दिली. खासदार डॉ. सुजय विखे यांनी सर्व तांत्रिक मार्गदर्शन केले. यामुळे अगदी कमी वेळेत हे रूग्णालय सुरू होवु शकले, असे तहसिलदार कुंदन हिरे यांनी सांगितले.
माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते या हॉस्पीटलचा रूग्णार्पण सोहळा शुक्रवारी झाला. यावेळी साईसंस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, संस्थानचे डेप्युटी सीईओ रविंद्र ठाकरे, तहसिलदार कुंदन हिरे, ज्ञानेश्वर गोंदकर, अभय शेळके, विजय कोते, जगन्नाथ गोंदकर, सुजीत गोंदकर, रविंद्र गोंदकर, नितीन कोते, महेश लोढा, अशोक गोंदकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद म्हस्के, डॉ. स्वाती म्हस्के, डॉ. संजय गायकवाड, डॉ. गोकुळ घोगरे, संस्थानचे वैद्यकीय संचालक डॉ. विजय नरोडे, डॉ. मैथिली पितांबरे, डॉ. प्रितम वडगावे, डॉ. दिपक कांदळकर व डॉ. शुभांगी कान्हे आदींची यावेळी उपस्थीती होती.

Web Title: Fifty-bed Kovid Hospital started in Sainagari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.