नशिबाने वाचले दोन मुलांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:26 AM2021-02-25T04:26:58+5:302021-02-25T04:26:58+5:30

विजय पांडुरंग गांगड हे दुपारच्या वेळेस मासे पकडण्याचे जाळे ओढण्यासाठी मुळा नदी पात्रात, तर पत्नी वैशाली गांगड या कपडे ...

Fate saved the lives of two children | नशिबाने वाचले दोन मुलांचे प्राण

नशिबाने वाचले दोन मुलांचे प्राण

Next

विजय पांडुरंग गांगड हे दुपारच्या वेळेस मासे पकडण्याचे जाळे ओढण्यासाठी मुळा नदी पात्रात, तर पत्नी वैशाली गांगड या कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या होत्या. या वेळेस त्यांची दोन लहान मुले विष्णू (वय ३) व कृष्णा (वय ८ महिने) हे दोघ घरात झोपलेले होते. कपडे धूत असताना घराच्या छतामधून धूर निघत असल्याचे वैशाली गांगड यांच्या लक्षात आले. नदीवरून पळत घराकडे आल्या, तोपर्यंत छताला आग लागली होती. त्यांनी धाडसाने आपल्या दोन्ही मुलांना बाहेर काढले. तोपर्यंत आगीने पूर्ण घराला वेढले होते. या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली असली, तरी या कुटुंबाच्या संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली. यामध्ये सात गाेणी धान्य, तांदूळ, कपडे, स्वयंपाकाची भांडी, मासे पकडण्यासाठी आणलेले चौदा हजारांचे जाळे जळून खाक झाले.

२४ आग

Web Title: Fate saved the lives of two children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.