रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:25 AM2021-03-01T04:25:44+5:302021-03-01T04:25:44+5:30

जामखेड : तालुक्यातील वंजारवाडी येथे रविवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर रानगव्याने हल्ला केला. यामध्ये ...

Farmers seriously injured in Rangavya attack | रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

Next

जामखेड : तालुक्यातील वंजारवाडी येथे रविवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर रानगव्याने हल्ला केला. यामध्ये शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. रानगवा आल्याचे समजताच ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग केल्याने तो पळून गेला.

संतोष दराडे, असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.

याबाबत वन विभाग सोमवारी रेस्क्यू ऑपरेशन करून त्याला पकडणार आहे. वंजारवाडी (ता. जामखेड) येथील शेतकरी संतोष भीमराव दराडे शेतात काम करीत होते. रविवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अचानक रानगव्याने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे शेतकरी मदतीला धावले. त्यांनी गव्याचा पाठलाग केला; परंतु अंधार पडू लागल्याने गवा पळून गेला.

ग्रामस्थांनी गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेला शेतकरी संतोष दराडे यांना फक्राबाद येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. फक्राबाद येथील पोलीस पाटील योगीनाथ जायभाय यांनी घटनेची माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना दिली. त्यांनी तातडीने वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबीलवार यांना माहिती देऊन या भागात वन विभागाचे पथक पाठविण्यास सांगितले.

वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश छबीलवार यांनी तातडीने जामखेड येथील वनखात्याचे पथक वंजारवाडी येथे पाठविले असून, सोमवारी रेस्क्यू ऑपरेशन करून ते गव्याचा शोध घेणार आहेत.

Web Title: Farmers seriously injured in Rangavya attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.