शेतकऱ्यांच्या शेतीची पाणपट्टी सेवा सोसायटीने भरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:22 AM2021-07-31T04:22:57+5:302021-07-31T04:22:57+5:30

निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची कुकडी पाटबंधारे प्रकल्पाची शेतीसाठी व पिण्याच्या ...

Farmers' agricultural watershed services should be paid by the society | शेतकऱ्यांच्या शेतीची पाणपट्टी सेवा सोसायटीने भरावी

शेतकऱ्यांच्या शेतीची पाणपट्टी सेवा सोसायटीने भरावी

Next

निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची कुकडी पाटबंधारे प्रकल्पाची शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी आकारण्यात येणारी पाणीपट्टी सेवा संस्थेमार्फत भरावी, अशी मागणी सभासद, शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी व ग्रामस्थांना आर्थिक मदत करण्यासाठी सेवा सोसायटीची १५ दिवसात विशेष सभा बोलवावी. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या पाणी मागणीनुसार आपल्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण पाणीपट्टी कायमस्वरूपी भरण्याचा ठराव मंजुरीसाठी सर्व सभासदांसमोर मांडावा व मंजूर करून घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. सोसायटी अध्यक्ष बाळासाहेब लामखडे व सचिव आर.के. भोसले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी सरपंच ठकाराम लंके, माजी अध्यक्ष अंकुश लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य शंकर गुंड, सेवा सोसायटीचे सदस्य सुनील वराळ आदी उपस्थित होते.

----

३० निघोज

Web Title: Farmers' agricultural watershed services should be paid by the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.