अखेर न्यायालयाने बाळ बोठे  याला केले फरार घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:51 PM2021-03-04T17:51:08+5:302021-03-04T17:51:36+5:30

अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने गुरुवारी फरार घोषित केले आहे. न्या. उमा बोर्‍हाडे यांनी हा आदेश दिला. दरम्यान न्यायालयाने दिनांक 9 एप्रिल पर्यंत त्याला स्वतःहून न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. जर तो हजर राहिला नाही तर त्याची मालमत्ता जप्त करण्यासह अन्य पुढील कारवाई पोलिसांकडून केली जाणार आहे.  स्टॅंडिंग वॉरंट काढल्यानंतरही बोठे मिळून न आल्याने त्यास फरार घोषित करण्याच्या मागणीसाठी या गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा पोलीस उप अधीक्षक अजित पाटील यांनी सीआरपीसी कलम 82 प्रमाणे  न्यायालयात अर्ज दाखल केला होता. 1 मार्च रोजी दाखल केलेल्या या अर्जासंदर्भात न्या. बोर्‍हाडे यांच्या न्यायालयासमोर बुधवारी (3 मार्च) सुनावणी झाली. त्यानंतर अंतिम आदेश न्यायालयाने गुरुवारी दिला.

Eventually, the court declared Bal Bothe absconding | अखेर न्यायालयाने बाळ बोठे  याला केले फरार घोषित

अखेर न्यायालयाने बाळ बोठे  याला केले फरार घोषित

googlenewsNext

 

रेखा जरे हत्याकांड: महिनाभरात हजर झाला नाही तर मालमत्तेवर येणार टाच

अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी पत्रकार बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने गुरुवारी फरार घोषित केले आहे. न्या. उमा बोर्‍हाडे यांनी हा आदेश दिला. दरम्यान न्यायालयाने दिनांक 9 एप्रिल पर्यंत त्याला स्वतःहून न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. जर तो हजर राहिला नाही तर त्याची मालमत्ता जप्त करण्यासह अन्य पुढील कारवाई पोलिसांकडून केली जाणार आहे.

 स्टॅंडिंग वॉरंट काढल्यानंतरही बोठे मिळून न आल्याने त्यास फरार घोषित करण्याच्या मागणीसाठी या गुन्ह्याचे तपासी अधिकारी तथा पोलीस उप अधीक्षक अजित पाटील यांनी सीआरपीसी कलम 82 प्रमाणे  न्यायालयात अर्ज दाखल केला होता. 1 मार्च रोजी दाखल केलेल्या या अर्जासंदर्भात न्या. बोर्‍हाडे यांच्या न्यायालयासमोर बुधवारी (3 मार्च) सुनावणी झाली. त्यानंतर अंतिम आदेश न्यायालयाने गुरुवारी दिला.

दरम्यान जरे हत्याकांड प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींविरुध्द दि.26 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी पारनेर येथील न्यायालयात दोषारोपपत्र दखल केले आहे. बोठे याच्या विरोधातही पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. नगर-पुणे महामार्गावर जातेगाव घाटात 30 नोव्हेंबर रोजी जरे यांची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती.या हत्याकांडाची बोठे यानेच सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. घटनेनंतर मात्र बोठे पसार झाला. सर्वत्र शोध घेऊनही बोठे सापडत नसल्याने पोलिसांनी आता कायदेशीर मार्गाने त्याच्या मुसक्या आवळण्याची तयारी सुरू केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार बोठे हा 9 एप्रिलपर्यंत स्वतःहून पोलिसात हजर झाला नाही तर त्याच्या मालमत्तेवर टाच येणार आहे.

Web Title: Eventually, the court declared Bal Bothe absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.