मानोरीत सरपंच सोडून आठ ग्रामपंचायत सदस्यांनी दिले राजीनामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 03:18 PM2020-07-15T15:18:31+5:302020-07-15T15:20:23+5:30

राहुरी तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांनी आपले राजीनामे सरपंच अब्बास शेख यांच्याकडे सुपूर्द केले. 

Eight Gram Panchayat members resigned except Sarpanch in Manori | मानोरीत सरपंच सोडून आठ ग्रामपंचायत सदस्यांनी दिले राजीनामे

मानोरीत सरपंच सोडून आठ ग्रामपंचायत सदस्यांनी दिले राजीनामे

Next

राहुरी : तालुक्यातील मानोरी ग्रामपंचायतीच्या आठ सदस्यांनी आपले राजीनामे सरपंच अब्बास शेख यांच्याकडे सुपूर्द केले.

मानोरी गावांमध्ये गाजत असलेल्या अतिक्रमणाच्या मुद्यावरून मंगळवारी (दि.१५ जुलै) शिवाजी थोरात, छाया पिले, शकुंतला चोथे, हिराबाई  दुबे या सदस्यांनी राजीनामे दिले. दरम्यान एक दिवस अगोदर उपसरपंच दिलावर पठाण, सदस्य बापूसाहेब देवकाते, शकुंतला आढाव, शामराव आढाव यांनी राजीनामे दिले आहेत. 

या राजीनामा देणाºया सदस्यांची संख्या आता आठवर गेली आहे. दरम्यान सरपंच अब्बास शेख यांचा राजीनामा पंचायत समितीकडे आला नव्हता.

सरपंच शेख यांनी सांगितले की, मी व सर्व सदस्यांनी गटविकास अधिका-यांची भेट घेतली आहे. त्यांनी संबंधित अतिक्रमण करणा-या ग्रामस्थांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे माझा राजीनामा थांबविला आहे.

Web Title: Eight Gram Panchayat members resigned except Sarpanch in Manori

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.