डॉ. आंबेडकर वसतिगृहात कोविड सेंटर नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:22 AM2021-03-05T04:22:07+5:302021-03-05T04:22:07+5:30

श्रीगोंदा : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जिल्हाधिकारी यांनी कोविडमुळे अधिग्रहित केले आहे. या वसतिगृहात पुन्हा कोविड सेंटर सुरू ...

Dr. No Kovid Center in Ambedkar Hostel | डॉ. आंबेडकर वसतिगृहात कोविड सेंटर नको

डॉ. आंबेडकर वसतिगृहात कोविड सेंटर नको

googlenewsNext

श्रीगोंदा : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जिल्हाधिकारी यांनी कोविडमुळे अधिग्रहित केले आहे. या वसतिगृहात पुन्हा कोविड सेंटर सुरू करू नये अशा मागणीसाठी विद्यार्थी, पालक आणि समविचारी संघटनांनी गुरुवारी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. तहसीलदार प्रदीप पवार यांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

श्रीगोंदा शहरातील महाविद्यालयात शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह आहे. या वसतिगृहात ग्रामीण भागातील ७५ मुले, १०० मुली शिक्षणासाठी राहत आहेत. हे वसतिगृह जिल्ह्यासह श्रीगोंदा तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने अधिग्रहित करण्यात आले. येथे कोविड सेंटर सुरू करू नये यासाठी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. तहसीलदार प्रदीप पवार यांनी वसतिगृह अधिग्रहित करणार नसल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

प्रियंका खेडकर, मयुरी शेंडगे, दीपाली मोरे, रूपाली साळवे या विद्यार्थी प्रतिनिधींसह सुनील ओहळ, संतोष शिंदे, वसंत नितनवरे, आप्पासाहेब रोकडे, भरत दिवटे, सुभाष उदमले आदी उपोषणास बसले होते.

---

०४ श्रीगोंदा उपोषण

श्रीगोंदा येथे तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेेले विद्यार्थी.

Web Title: Dr. No Kovid Center in Ambedkar Hostel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.