डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ठिकठिकाणी अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:20 AM2021-04-15T04:20:49+5:302021-04-15T04:20:49+5:30

जामखेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करत उत्साहात साजरी ...

Dr. Greetings to Babasaheb Ambedkar | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ठिकठिकाणी अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ठिकठिकाणी अभिवादन

Next

जामखेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करत उत्साहात साजरी करण्यात आली. मिलिंदनगर येथे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भिमसैनिक सर्व समाजबांधव उपस्थित होते. सिद्धार्थनगर, सदाफुले वस्ती, बाजार समिती, शासकीय व निमशासकीय कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. तसेच मिलिंदनगर येथील गौतमी आव्हाड व सहकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ऑनलाइन भीमगीते सादर करून सर्वांची मने जिंकली.

--

१४ जामखेड आंबेडकर

जामखेडच्या मिलिंदनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Web Title: Dr. Greetings to Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.