दहा वर्षानंतर उघडले पोलीस चौकीचे दार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 01:14 PM2019-11-09T13:14:01+5:302019-11-09T13:14:07+5:30

मांडवगण येथील पोलीस चौकी गेल्या दहा वषार्पासून बंद होती. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या हस्ते शुक्रवारी पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्यात आली. 

The door to the police outpost opened ten years later | दहा वर्षानंतर उघडले पोलीस चौकीचे दार

दहा वर्षानंतर उघडले पोलीस चौकीचे दार

Next

श्रीगोंदा  : तालुक्यातील मांडवगण येथील पोलीस चौकी गेल्या दहा वषार्पासून बंद होती. सामाजिक कार्यकर्ते निलेश बोरुडे यांनी गेल्या आठवड्यात पोलीस चौकी सुरू करण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी तातडीने पोलीस चौकी सुरू करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या हस्ते शुक्रवारी पोलीस चौकी पुन्हा सुरू करण्यात आली. 
मांडवगण हे श्रीगोंदा शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. शहराच्या जवळून नगर-सोलापूर राज्य मार्ग गेला आहे. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण मोठे आहे. पोलीस स्टेशनच्या किरकोळ कामासाठी श्रीगोंद्याला जावे लागत होते. मांडवगण परिसरातील नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी प्रयत्न केले. १९९३ मध्ये मांडवगणला पोलीस चौकी सुरू झाली? पण दहा, बारा वर्षात ही चौकी बंद झाली होती.  बंद असलेली पोलीस चौकी सुरू करुण्यासाठी निलेश बोरूडे त्यांच्या सहकाºयांनी पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांची भेट घेऊन लक्ष वेधले होते. तातडीने या ठिकाणी एक सहाय्यक फौजदार, दोन कॉस्टेबलची नियुक्ती करण्यात आली आहे. 
यावेळी उपसरपंच सुरेश लांडगे, पाटबंधारे विभागाचे माजी अभियंता झुंबरराव बोरुडे, पूनम वाघमारे, अमोल रायकर, शिवाजी शेलार, मोहन पवार, विजय बोरुडे, राजेंद्र लोखंडे, सुभाष शिंदे, तुळशीराम रायकर, सिद्धेश्वर शेळके, सचिन शेळके, निलेश विधाते, लखन लोखंडे, राजेंद्र रायकर, तुळशीराम बोरुडे उपस्थित होते.

Web Title: The door to the police outpost opened ten years later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.