श्रीरामपूर बंदची सरसकट सक्ती नको-आमदार लहू कानडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 01:52 PM2020-09-11T13:52:55+5:302020-09-11T13:53:27+5:30

श्रीरामपूर : शहरात स्वत:च्या सुरक्षेसाठी कोणी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवत असेल तर त्याचे स्वागत आहे. मात्र उपासमारीची वेळ आलेल्या सामान्य माणसांना बंदमध्ये बळजबरीने सहभागी करून घेऊ नये. त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकाार आहे, असे काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी स्पष्ट केले.

Don't force the Shrirampur bandh altogether - MLA Lahu Kanade | श्रीरामपूर बंदची सरसकट सक्ती नको-आमदार लहू कानडे 

श्रीरामपूर बंदची सरसकट सक्ती नको-आमदार लहू कानडे 

googlenewsNext

श्रीरामपूर : शहरात स्वत:च्या सुरक्षेसाठी कोणी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवत असेल तर त्याचे स्वागत आहे. मात्र उपासमारीची वेळ आलेल्या सामान्य माणसांना बंदमध्ये बळजबरीने सहभागी करून घेऊ नये. त्यांना व्यवसाय करण्याचा अधिकाार आहे, असे काँग्रेस पक्षाचे आमदार लहू कानडे यांनी स्पष्ट केले.


येत्या रविवारपासून शहरात आठ दिवसांची जनता संचारबंदी लागू करण्याचा निर्णय झाला आहे.  त्याकरिता शुक्रवारी रिक्षाद्वारे व्यावसायीकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे यांनी मात्र याधीच बंदला उघडपणे विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतने आमदार कानडे यांची भूमिका जाणून घेतली.


आमदार कानडे म्हणाले, केंद्र सरकारने घाईघाईत केलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था रसातळाला गेली. विकासदर हा वजा चोवीसपर्यंत कोसळला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गोरगरीबांची अर्थव्यवस्था मूळ पदावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे लॉकडाऊन बंद करून सर्व व्यवहार सुरू केले जात आहेत. सरकारचा प्राधान्यक्रम हा गरीब माणसांचा मृत्यूदर कमी करण्याला आहे. त्यामुळे येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये ५० खाटांचे कोवीड केंद्र सुरू होत आहे.


नगरपालिकेने स्वच्छतेचे काम चोखपणे पार पाडावे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एसएमएस मंत्र दिला आहे. घराबाहेर पडताना मास्क वापरण्याची खबरदारी घ्यावी, नियमिपणे हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन कानडे यांनी केले.
-----------
कोरोनासोबत जगावे लागेल
कोरोनासोबत जीवन जगण्यासाठी समाजाला प्रवृत्त करावे लागेल. समाज हे हळूहळू शिकत आहे. गरीबांचा गेलेला रोजगार पुन्हा प्राप्त करून द्यायचा आहे. काँग्रेस पक्ष देशभर रोजगार दो हे आंदोलन करत आहे. या अभियानात आपण स्वत: सहभागी आहोत. त्यामुळे पक्ष गरिबांचा विचार प्राधान्यक्रमाने करत आहे, असे आमदार कानडे यांनी स्पष्ट केले.

Web Title: Don't force the Shrirampur bandh altogether - MLA Lahu Kanade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.