लॉकडाऊनमध्ये साईबाबांना अडीच कोटीची देणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 03:08 PM2020-05-04T15:08:49+5:302020-05-04T15:09:50+5:30

कोरोनाच्या संकटामुळे १७ मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे़ गेल्या ४८ दिवसांच्या कालावधीत साईभक्तांकडून आॅनलाईनव्दारे साईबाबांना २ कोटी ५३ लाख ९७ हजार ७७८ रुपये देणगी संस्थानला प्राप्त झाली असल्याची माहिती सोमवारी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी ‘लोकमत’ला दिली.

Donation of Rs 2.5 crore to Sai Baba in lockdown | लॉकडाऊनमध्ये साईबाबांना अडीच कोटीची देणगी

लॉकडाऊनमध्ये साईबाबांना अडीच कोटीची देणगी

Next

शिर्डी : कोरोनाच्या संकटामुळे १७ मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. गेल्या ४८ दिवसांच्या कालावधीत साईभक्तांकडून आॅनलाईनव्दारे साईबाबांना २ कोटी ५३ लाख ९७ हजार ७७८ रुपये देणगी संस्थानला प्राप्त झाली असल्याची माहिती सोमवारी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी ‘लोकमत’ला दिली.
देशात व राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आले. संस्थानने तत्पूर्वीच १७ मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद केले होते. साईबाबांचा महिमा व त्यांची शिकवणूक संपूर्ण जगात पोहचलेली असून त्यांचा भक्त वर्ग देशात व परदेशात मोठ्या प्रमाणात आहे. मंदिर बंदच्या काळात टाटा स्कॉय, संस्थान संकेतस्थळ व मोबाईल अ‍ॅप्सव्दारे थेट आॅनलाईन दर्शनाचा लाभ साईभक्त घर बसल्या घेत आहेत. यामध्ये टाटा स्कॉयवर सुमारे ३५ लाख साईभक्त अ‍ॅक्टीवेट असून १ लाख १२ हजार साईभक्तांनी संस्थानचे मोबाईल अ‍ॅप्स डाऊनलोड केलेले आहे. तर संकेतस्थळाला दररोज सुमारे ८ ते ९ हजार साईभक्त भेट देत आहे, अशी माहितीही डोंगरे यांनी दिली. 
आॅनलाईन देणगीचा ओघ 
साईबाबांचे मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी बंद असले तरी ही साईभक्तांनी बाबांना दक्षिणा देण्याची परंपरा सुरु ठेवली आहे़ जगाच्या व देशाच्या कानाकोप-यातून साईभक्त संकेतस्थळाव्दारे व मोबाईल अ‍ॅप्सव्दारे आॅनलाईन देणगी संस्थानला पाठवत आहे. यातूनही ही ४८ दिवसात अडीच कोटींची देणगी मिळाल्याचे अरुण डोंगरे यांनी सांगितले. 
 

Web Title: Donation of Rs 2.5 crore to Sai Baba in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.