कासारपिंपळगाव ग्रामपंचायतीवर आदिनाथ ग्रामविकास मंडळाचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:21 AM2021-01-23T04:21:59+5:302021-01-23T04:21:59+5:30

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील कासारपिंपळगाव येथे मतदारांनी विकासाची पाठराखण केली. विद्यमान सरपंच मोनाली राजळे यांच्या नेतृत्वाखालील आदिनाथ ग्रामविकास मंडळाने ...

Dominance of Adinath Gram Vikas Mandal over Kasarpimpalgaon Gram Panchayat | कासारपिंपळगाव ग्रामपंचायतीवर आदिनाथ ग्रामविकास मंडळाचे वर्चस्व

कासारपिंपळगाव ग्रामपंचायतीवर आदिनाथ ग्रामविकास मंडळाचे वर्चस्व

Next

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील कासारपिंपळगाव येथे मतदारांनी विकासाची पाठराखण केली. विद्यमान सरपंच मोनाली राजळे यांच्या नेतृत्वाखालील आदिनाथ ग्रामविकास मंडळाने सर्व अकरा जागा जिंकून ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले. परिवर्तन ग्रामविकास मंडळाची एकही जागा निवडून आली नाही.

गावातील गल्लीबोळात झालेले काँक्रीटचे रस्ते, पिण्याच्या पाण्यासह सांडपाणी व्यवस्था, प्रमुख रस्त्यांच्या दुतर्फा केलेले वृक्षारोपण, वृद्धा नदीवरील जलसंवर्धन आदी आदर्श गाव पाटोदाच्या धर्तीवरील विकास मतदारांना भावला. मोठा विजय मिळवूनही सार्वजनिकरीत्या कोणताही जल्लोष न करता विजयी उमेदवारांनी गावातून काढलेली अभिवादन फेरी तालुक्यात चर्चेची ठरली.

विजयी उमेदवार असे : मोनाली राजळे, योगिता भगत, आरती जगताप, आशा तिजोरे, उषा तुपे, जमुना खोजे, संभाजी राजळे, आप्पा राजळे, गोविंद माळी, अंकुश राजळे, अण्णासाहेब तिजोरे.

सिद्धसावली निवासस्थानी आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते नूतन सदस्य व विजयाचे शिल्पकार ठरलेल्या ज्येष्ठांसह तरुणांचा सत्कार करण्यात आला.

फोटो : २२ कासारपिंपळगाव ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवार व आमदार मोनिका राजळे.

Web Title: Dominance of Adinath Gram Vikas Mandal over Kasarpimpalgaon Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.