दिवाळी पाडव्याला साईदरबार भाविकांसाठी खुला होणार, सुरुवातील केवळ सहा हजार भाविकांना दर्शन मिळणार

By बाळकृष्ण परब | Published: November 14, 2020 05:24 PM2020-11-14T17:24:53+5:302020-11-14T17:26:03+5:30

Shirdi Sai Mandir : पाडव्याच्या दिवशी प्राधान्याने ग्रामस्थांना टप्याटप्प्याने दर्शन देण्यात येईल. शिर्डी बाहेरील भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने पास काढूनच दर्शनासाठी यावे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भाविकांनी एकाच वेळी दर्शनासाठी गर्दी करू नये

On Diwali Padva, Sai Mandir will be open for devotees, initially only 6,000 devotees will get darshan | दिवाळी पाडव्याला साईदरबार भाविकांसाठी खुला होणार, सुरुवातील केवळ सहा हजार भाविकांना दर्शन मिळणार

दिवाळी पाडव्याला साईदरबार भाविकांसाठी खुला होणार, सुरुवातील केवळ सहा हजार भाविकांना दर्शन मिळणार

googlenewsNext

शिर्डी - राज्य सरकारने येत्या पाडव्याला, १६ नोव्हेंबर रोजी साईमंदीर उघडण्याचा निर्णय घेवुन जगभरातील भाविकांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. मंदीरे उघडण्यासाठी फारच कमी वेळ मिळाल्याने राज्यभरातील मोठ्या मंदीर व्यवस्थापनांची धावपळ होणार आहे.

पाडव्याच्या दिवशी प्राधान्याने ग्रामस्थांना टप्याटप्प्याने दर्शन देण्यात येईल. शिर्डी बाहेरील भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने पास काढूनच दर्शनासाठी यावे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भाविकांनी एकाच वेळी दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी केले. यावेळी डेप्युटी सीईओ रविंद्र ठाकरे व मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, मंदीर प्रमुख रमेश चौधरी उपस्थीत होते.

कोरोनामुळे १७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता साईमंदीर बंद करण्यात आले होते. तब्बल २४२ दिवसांनी पाडव्याला साईमंदीर उघडणार आहे. सूरवातीला  सहा हजार भाविकांना ऑनलाईन पद्धतीने रोज दर्शन घेता येईल. हळुहळु ही संख्या वाढवण्यात येईल.

६५ वर्षावरील वृद्धांना दर्शनाची अनुमती नसेल. दर्शन रांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग व पाय धुण्याची व्यवस्था असेल. भाविकाला ताप असेल तर त्यास तत्काळ संस्थान रूग्णालयात दाखल करण्यात येईल. भाविक कोरोना बाधित आढळला तर त्याला संस्थानच्या कोविड उपचार केंद्रात दाखल करण्यात येईल. रोज दर्शन घेणाऱ्या भाविकांमधुन किमान पन्नास भाविकांना आठवडाभराने फोन करून तब्येती विषयी फिडबॅक घेतला जाणार आहे.

भाविकांना समाधी व द्वारकामाई मंदीरात जावुन दर्शन घेता येईल मात्र चावडी आणि मारूती मंदीरात बाहेरूनच दर्शन घ्यावे लागेल. समाधी दर्शनानंतर बॅरिगेटींग मधुन पाच नंबर गेटने भाविकांना बाहेर पाठवले जाईल. भाविकांना मंदीरात हार, प्रसाद आदी पुजा साहित्य नेता येणार नाही. सत्यनारायण, अभिषेक पुजा, ध्यानमंदीर, पारायण कक्ष बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांना केवळ उदी देण्यात येईल, बुंदी प्रसाद किंवा दर्शन रांगेतील कॅन्टीन मध्ये चहा-बिस्कीटे मिळणार नाही. कोरोनाचा संसर्ग कमी होताच हळुहळु भाविकांना पुर्वी प्रमाणे दर्शन व अन्य सुविधा मिळतील. प्रसादालय व भक्तनिवास सुरू करण्यात येणार आहे. भक्तनिवासात रोज एकाआड एक रूम देण्यात येणार आहे.  राज्य सरकारच्या निर्णयाचे साईनगरीत फटाके फोडून व मिठाई वाटून स्वागत करण्यात आले.

Web Title: On Diwali Padva, Sai Mandir will be open for devotees, initially only 6,000 devotees will get darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.