जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये ८० टक्के फळांना मिळतो कमी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 12:06 PM2020-07-06T12:06:48+5:302020-07-06T12:07:25+5:30

अहमदनगर : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये फळे खरेदी करताना व्यापारी सर्रास क्विंटलमागे एक किलोची घट धरतात़ शेतकºयांकडून ही बेकायदेशीर वसुली केली जात आहे़ तसेच वर्गवारी करताना २० टक्के फळांचाच फक्त प्रथम वर्गवारीमध्ये समावेश केला जात असून, उर्वरित ८० टक्के फळांचा समावेश ३ ते ६ या वर्गवारीत होतो़ त्यामुळे ८० टक्के फळांना कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होते़ बाजार समित्यांचे पदाधिकारी, कर्मचारीही व्यापाºयांना पूरक भूमिका घेत असल्याचे दिसते़.

In the district market committees, 80 per cent of the fruits fetch low prices | जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये ८० टक्के फळांना मिळतो कमी भाव

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये ८० टक्के फळांना मिळतो कमी भाव

googlenewsNext

अण्णा नवथर  

अहमदनगर : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये फळे खरेदी करताना व्यापारी सर्रास क्विंटलमागे एक किलोची घट धरतात़ शेतकºयांकडून ही बेकायदेशीर वसुली केली जात आहे़ तसेच वर्गवारी करताना २० टक्के फळांचाच फक्त प्रथम वर्गवारीमध्ये समावेश केला जात असून, उर्वरित ८० टक्के फळांचा समावेश ३ ते ६ या वर्गवारीत होतो़ त्यामुळे ८० टक्के फळांना कमी भाव मिळत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान होते़ बाजार समित्यांचे पदाधिकारी, कर्मचारीही व्यापाºयांना पूरक भूमिका घेत असल्याचे दिसते़.


नगर जिल्ह्यात संत्री, लिंबू, डाळिंब, द्राक्षे, कलिंगड, चिकू, पेरू, आंबा या फळांचे सर्वाधिक उत्पादन होते़ राहाता बाजार समितीत डाळिंब, नगर बाजार समिती संत्री आणि श्रीगोंद्यात लिंबाची मोठ्या प्रमाणावर खरेदी- विक्री होते़  नगर जिल्ह्यात फळांचे मोठे मार्केट नसल्याने शेतकरी सोलापूर, पंढरपूर बाजार समितीत फळे विक्रीसाठी घेऊन जातात़ पूर्वी फळांच्या विक्रीवर ८ ते १० टक्के कमिशन आकारले जात होते़ ही पध्दत सरकारने बंद केली़ परंतु, शेतकरी वाहतूक भाडे देण्यासाठी उचल घेतात़ त्यातून २ टक्के कमिशन काही बाजार समित्या आकारतात़ यावर कुणाचाही अंकुश नाही़ याशिवाय क्विंटलमागे १ किलोची घट बेकायदेशीररित्या धरली जाते़ एक किलोचे पैसे शेतकºयांना कमी दिले जातात़विशेष म्हणजे शेतकºयाने ५० किलो फळे जरी बाजार समितीत विक्रीसाठी नेले तरी त्यातही १ किलोची घट धरून पट्टी शेतकºयांच्या हातात टेकविली जात आहे़ शेतकºयांनी यावर आवाज उठवूनही बाजार समित्या जाणिवपूर्वक त्याकडे डोळेझाक करीत आहेत़.


फळ विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन गेल्यानंतर तिथे फळांची वर्गवारी केली जाते़ फळांची वर्गवारी करताना शेतकºयांचे हित लक्षात घेतले जात नाही़  हमाल व व्यापाºयांचे लागेबांधे असल्याने ते व्यापाºयांचे हित पाहून वर्गवारी करतात़ त्यामुळे २० टक्के मालाला चांगला भाव मिळतो़ परंतु, उर्वरित ८० टक्के माल कमी दराने विकला जातो़ संत्रीचा प्रति किलो ८० रुपयांनी लिलाव झाल्यास सरासरी भाव ४० रुपये मिळतो़ फळांच्या वर्गवारीमुळे शेतकºयांना एकसारखा भाव मिळत नाही़ त्यामुळे शेतकºयांचा तोटा होतो़.

 

बांधावर विक्री करतानाही शेतकºयांची फसवणूक
४बहुतांश शेतकरी शेतातच व्यापाºयांना फळांची विक्री करतात़ ही खरेदी करतानाही १ क्विंटलमागे ५ किलोची घट गृहीत धरूनच शेतकºयांना पैसे दिले जातात़ बांधावर खरेदी-विक्रीत घट धरणे हा अलिखित नियमच झाला आहे़ बांधावरील खरेदी- विक्रीत बºयाचवेळा व्यापारी चांगला माल घेऊन जातात़ उर्वरित माल नेत नाहीत़ फळांची वर्गवारी करून खरेदी केली जात असल्याने शेतकºयांचा तोटा होतो़.

शीतगृहे नसल्याने शेतकºयांची अडचण
४फळांचे उत्पादन जास्त झाल्यास ते साठवून ठेवण्याची व्यवस्था नाही़ सरकारकडून तशी सुविधा उपलब्ध केली नाही़ खासगी संस्थांनी शीतगृहे उभारलेले आहेत़ परंतु, त्याचे दर शेतकºयांना परवडणारे नाही़ त्यामुळे मिळेल त्या भावात फळे विकावी लागतात़.

----------

फळांची खरेदी करताना क्विंटलमागे १ किलोची घट धरणे, हे कोणत्याही कायद्यात नाही़ परंतु, बाजार समित्यांकडून अधिकृतरित्या १ किलोची घट धरली जाते़ तसेच वर्गवारी करताना व्यापाºयांचे हित लक्षात घेतले जात असून, २० टक्के फळांना चांगला भाव मिळतो़ उर्वरित फळांना कमी भाव मिळतो़   

 -रमेश ठोंबरे, फळ उत्पादक     शेतकरी, तांदळी वडगाव

----------------

लिंबाचे उत्पादन श्रीगोंदा तालुक्यात जास्त आहे़ तिथे लिंबाचे लिलाव होतात़ डाळिंबाचे लिलाव राहाता बाजार समितीत होतात़ शेतकºयांची फसवणूक झाल्यास आडत्यांना २४ तासात पैसे शेतकºयांना देणे बंधनकारक आहे़
    -थोरवे, जिल्हा उपनिबंधक

Web Title: In the district market committees, 80 per cent of the fruits fetch low prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.