कोरोनासाठी जिल्हा मराठा शिक्षण संस्था मुख्यमंत्री निधीसाठी ५० लाख देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 01:06 PM2020-03-31T13:06:12+5:302020-03-31T13:07:35+5:30

कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी नगर जिल्ह्यातील जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेने मुख्यमंत्री निधीसाठी ५० लाख रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे व सचिव जी. डी. खानदेशे यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.

District Maratha Education Institute will provide Rs. 2 lakh for the Chief Minister's Fund | कोरोनासाठी जिल्हा मराठा शिक्षण संस्था मुख्यमंत्री निधीसाठी ५० लाख देणार

कोरोनासाठी जिल्हा मराठा शिक्षण संस्था मुख्यमंत्री निधीसाठी ५० लाख देणार

Next

अहमदनगर : कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी नगर जिल्ह्यातील जिल्हा मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेने मुख्यमंत्री निधीसाठी ५० लाख रुपये निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे व सचिव जी. डी. खानदेशे यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला ही माहिती दिली.
संस्थेचे विश्वस्त, कार्यकारिणी, पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे सर्व मिळून हा निधी देणार आहेत. कोरोनाचे संकट हे मोठे आहे. यात सर्वसामान्य व कष्टकरी माणसांवरही संकट आले आहे. अशावेळी सर्वांनी सरकारच्या पाठिशी उभे राहणे व सर्वसामान्य माणसांना दिलासा देणे आवश्यक आहे. या बांधिलकीतूनच संस्थेच्या पदाधिका-यांनी व कर्मचाºयांनी मिळून आपला सहयोग देण्याचा निर्णय घेतला असल्याचे झावरे यांनी सांगितले. 

Web Title: District Maratha Education Institute will provide Rs. 2 lakh for the Chief Minister's Fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.