भाविकांनो यंदा गुरूपौर्णिमेला सार्इंना प्लाझमाचे दान द्या, साईसंस्थानचे आवाहन                        

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 01:59 PM2020-07-02T13:59:29+5:302020-07-02T13:59:39+5:30

शिर्डी: देशभरातील लाखो रूग्ण कोविड आजारावर मात करून पूर्ण बरे होत आहेत़ यात साईबाबांवर अढळ श्रद्धा असणाºया व बाबांना ...

Devotees donate plasma to all on Guru Purnima this year, Sai Sansthan appeals | भाविकांनो यंदा गुरूपौर्णिमेला सार्इंना प्लाझमाचे दान द्या, साईसंस्थानचे आवाहन                        

भाविकांनो यंदा गुरूपौर्णिमेला सार्इंना प्लाझमाचे दान द्या, साईसंस्थानचे आवाहन                        

Next

शिर्डी: देशभरातील लाखो रूग्ण कोविड आजारावर मात करून पूर्ण बरे होत आहेत़ यात साईबाबांवर अढळ श्रद्धा असणाºया व बाबांना गुरूस्थानी मानणाºया भाविकांची संख्याही लक्षणीय असेल़ कोरोनामुक्त झालेल्या या भाविकांनी यंदा गुरूपौर्णिमेनिमीत्त रक्तातील प्लाझमाचे दान करून बाबांच्या रूग्णसेवेच्या कार्याला हातभार लावावा, अशी भावनिक साद साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांनी घातली आहे़.


स्वच्छेने व बाबांवरील श्रद्धेपोटी रक्तातील प्लाझमा दान देवु इच्छिणाºया भाविकांनी पुर्ण कोविड मुक्त झाल्यानंतर २८ दिवसांनी आपल्या जवळच्या रक्तदान केंद्रावर जावुन यासाठी रक्तदान करावे व आपला फोटो, नाव, पत्ता व डोनेशन कार्ड संस्थानला माहितीसाठी मेलवर पाठवावे असे आवाहनही त्यांनी केले़.


साईबाबांना गुरूपौर्णिमेलाच नाही तर वर्षभर दान देणारे देशभरात लाखो भाविक आहेत़ सध्या कोरोना महामारीने पीडीत रूग्णांवरील प्रभावी उपचारासाठी कोविड आजारावर मात करून बरे झालेल्या रूग्णांच्या प्लाझमाची गरज आहे़. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यासाठी आवाहन केलेले आहे़. या पार्श्वभुमीवर साईसंस्थानने सार्इंच्या रूग्णसेवेला अधोरेखित करत भाविकांना यंदा इतर दाना ऐवजी प्लाझमाचे दान देण्याचे आवाहन केले आहे़. यातुन लाखो रूग्णांचे जीव वाचतील ही साईबाबांसाठी खुप अमुल्य गुरूदक्षिणा असेल असे डोंगरे यांनी म्हटले आहे़.


    याशिवाय साईसंस्थानच्या रूग्णालयालाही सध्या रक्ताचा तुटवडा भासत आहे़ रक्ताच्या उपलब्धतेसाठी संस्थानच्या रक्तपेढीने यंदा गुरूपौर्णिमेच्या दिवशी साईआश्रम येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे़. स्थानिक भाविकांनी, ग्रामस्थांनी व कर्मचाºयांनी या शिबीरात रक्तदान करून सार्इंचा रूग्णसेवेचा वारसा अधिक दृढ करावा, असे आवाहनही डोंगरे यांनी केले़.

साईसंस्थानच्या रक्तपेढीकडे रक्तातील प्लाझमा वेगळा करणारी यंत्रणा आहे़ मात्र त्यासाठी लागणारी संबधित संस्थाची अनुमती नाही़, संस्थानचे रूग्णालय प्रशासन ही मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे डोंगरे यांनी सांगितले़, यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, साईबाबा रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ़ विजय नरोडे, साईनाथ रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ़ मैथिली पितांबरे, वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी डॉ़ प्रितम वडगावे, संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव उपस्थित होते़.
 

Web Title: Devotees donate plasma to all on Guru Purnima this year, Sai Sansthan appeals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.