नाल्यांच्या हद्द निश्चितीला नगररचनाकडून बगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:20 AM2021-05-17T04:20:05+5:302021-05-17T04:20:05+5:30

अहमदनगर : मागील वर्षी शहरातील नाल्यांची हद्द निश्चित करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला होता. मात्र, गेल्या वर्षभरात याबाबत कोणतीही कार्यवाही ...

Determining the boundaries of nallas aside from town planning | नाल्यांच्या हद्द निश्चितीला नगररचनाकडून बगल

नाल्यांच्या हद्द निश्चितीला नगररचनाकडून बगल

Next

अहमदनगर : मागील वर्षी शहरातील नाल्यांची हद्द निश्चित करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला होता. मात्र, गेल्या वर्षभरात याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. मनपाने पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई सुरू केली असून, यंदाही नालेसफाई होणार नसल्याचेच यावरून अधोरेखित झाले आहे.

महापालिकेच्या वतीने शहरातील नालेसफाईचे काम रविवारी सुरू करण्यात आले. ओढ्या-नाल्यांतील जिथे मोकळी जागा आहे तोच भाग फक्त गाळ काढून प्रवाह मोकळा करणे, असे यंदाच्या नालेसफाई मोहिमेचे स्वरूप आहे. मागील वर्षी पावसाळ्यात ओढे-नाले तुंबून नागरिकांच्या घरात पाणी घुसले होते. तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी नालेसफाईची पाहणी करून नाल्यांची हद्द निश्चित करण्याचा आदेश नरगरचना विभागाला दिला होता, तसेच अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्याच्या सूचना केल्या गेल्या. मात्र, पाऊस ओसरताच नगररचना विभागाने याकडे सोयीस्कररीत्या डोळेझाक केली. वर्ष उलटूनही नाल्यांची हद्द निश्चित करण्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. पावसाळा तोंडावर आल्याने महापालिकेने पावसाळ्यापूर्वीची कामे हाती घेतली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नालेसफाईला सुरुवात केली; परंतु गेल्या वर्षभरात नाल्यांची हद्द निश्चित केली गेली नाही. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे केवळ मोकळ्या जागेतील गाळ काढून प्रवाह मोकळे केले जाणार आहेत. नालेसफाईवर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र, अतिक्रमणांमुळे प्रवाह अडले गेले असून, ते मोकळे करण्याची तसदी महापालिका घेत नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणे याही वर्षी नागरिकांना पूर परिस्थितीला सामाेरे जावे लागणार असल्याचे यावरून स्पष्ट होते.

...

ज्येष्ठ नागरिक कृती मंचने केली हाेती पाहणी

मागील वर्षी ज्येष्ठ नागरिक कृती मंचचे सदस्य व महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नाल्यांची संयुक्त पाहणी केली होती. प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर रोजनामाही लिहिण्यात आला होता; परंतु त्यावरही वर्षभरात कोणतीही कार्यवाही झाली नाही. ज्येष्ठ नागरिक कृती मंचच्या सूचनांकडे महापालिकेने दुर्लक्ष केले.

....

Web Title: Determining the boundaries of nallas aside from town planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.