बोल्हेगाव येथे पोलीस चौकीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:24 AM2021-03-09T04:24:24+5:302021-03-09T04:24:24+5:30

.... पाणीप्रश्नी शिंदे यांचा उपोषणाचा इशारा अहमदनगर : कल्याण रोड परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, गेल्या पंधरा ...

Demand for a police outpost at Bolhegaon | बोल्हेगाव येथे पोलीस चौकीची मागणी

बोल्हेगाव येथे पोलीस चौकीची मागणी

googlenewsNext

....

पाणीप्रश्नी शिंदे यांचा उपोषणाचा इशारा

अहमदनगर : कल्याण रोड परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, गेल्या पंधरा वर्षांपासून या भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. महापालिका प्रशासनाला निवेदन देऊनही पाणी प्रश्न सुटलेला नाही. विविध आंदोलने, रस्ता रोको, पालिकेत नागरिकांसह पालिका प्रशासनाबरोबर पाणी प्रश्नाबाबत अनेकवेळा चर्चा झाली. परंतु. अद्याप या भागाचा पाणीपुरवठा सुरळीत न केल्याने बुधवारी महापालिकेसमोर उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा सेनेचे नगरसेवक सचिन शिंदे यांनी निवेदनाद्वारे सोमवारी दिला.

......

सेनेचा आंदोलनाचा इशारा

अहमदनगर: बालिकाश्रम रोडसह कल्याण रोड आणि नालेगाव परिसरातील पाणी प्रश्‍न गंभीर बनला असून महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी उपमहापौर अनिल बोरूडे, नगरसेवक शाम नळकांडे, नगरसेवक गणेश कवडे यांनी सोमवारी दिला. बालिकाश्रम रोडसह या भागातील पाणीप्रश्नी सेनेच्या नगरसेवकांनी उपायुक्त यशवंत डांगे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

....

वंदेमातरम् युवा प्रतिष्ठानतर्फे घुले यांचा सत्कार

अहमदनगर: महापालिका स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांचा वंदेमातरम युवा प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी सत्कार करण्यात आला. यावेळी ईश्वर बोरा, चिंटू खंडेलवाल, मनीष सोनग्रा, संदीप बायड, गणेश गोयल, आदित्य गांधी, संभव काथेड, संतोष ठाकूर, हेमंत रासने, संजय कांगला, प्यारेलाल खंडेलवाल, रवी किथानी, अजय ढोणे, भैया भांडेकर आदी उपस्थित होते.

.....

Web Title: Demand for a police outpost at Bolhegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.