गटेवाडी मारहाणप्रकरणी कारवाई विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:20 AM2021-03-07T04:20:01+5:302021-03-07T04:20:01+5:30

सुपा : नुकत्याच पार पडलेल्या पारनेर तालुक्यातील गटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचा राग मनात धरून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य किरण ...

Delay in action in Gatewadi assault case | गटेवाडी मारहाणप्रकरणी कारवाई विलंब

गटेवाडी मारहाणप्रकरणी कारवाई विलंब

googlenewsNext

सुपा : नुकत्याच पार पडलेल्या पारनेर तालुक्यातील गटेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीचा राग मनात धरून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य किरण गट व त्यांचे चुलत बंधू कैलास गट यांना राजकीय वैमनस्यातून गंभीर मारहाण झाली. याप्रकरणी कारवाई करण्यास विलंब होत आहे. तरी गुंडगिरी विरोधात पोलिसांनी तातडीने उपाय योजना करावी, अशी मागणी गटेवाडीच्या सरपंच मंगल गट व त्यांच्या सहकारी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.

गटेवाडी-वडनेर शिवारातील कन्हैया कंपनीसमोर घाणेगाव, पळवे, पारनेर येथील गुंड प्रवृत्तीच्या १५ ते २० जणांच्या टोळक्याने हॉकी स्टिक, लोखंडी रॉडने किरण गट व कैलास गट यांना मारहाण केली होती. या घटनेला जवळपास ५ ते ६ दिवस झाले तरी याप्रकरणी संबंधित गुंडप्रवृत्तीच्या लोकांविरोधात सुपा पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे भविष्यात अशा लोकांकडून इतरांनाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे ग्रामस्थांतूनही संताप व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत सदस्य किरण गट यांना मारहाण झाल्यानंतर त्यांच्यावर शासकीय दवाखान्यात उपचार करण्यात आले. याप्रकरणी कारवाई करण्यास होणाऱ्या विलंबाने पोलिसांच्या भूमिकेविषयी ग्रामस्थांच्या मनात संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी तत्काळ कारवाई करायला हवी, अशी अपेक्षा सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केली.

---

गटेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य किरण गट व त्यांचे चुलत बंधू कैलास गट यांना झालेल्या मारहाणीप्रकरणी त्यांच्यावर उपचार झालेल्या दवाखान्याकडून प्रमाणपत्र प्राप्त होताच संबंधितांवर गुन्हा दाखल करू.

-चंद्रकांत कोसे,

पोलीस उपनिरीक्षक, सुपा

Web Title: Delay in action in Gatewadi assault case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.