साईबाबा संस्थानला रोज चार लाखांची देणगी; पावणे दोन कोटींची घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 11:40 AM2020-05-11T11:40:52+5:302020-05-11T11:41:45+5:30

लॉकडाऊनच्या काळात साईसंस्थानला आॅनलाईनच्या माध्यमातून रोज सरासरी चार लाख  रुपयांची देणगी मिळत आहे. इतरवेळी प्रत्यक्षपणे रोज मिळणा-या देणगीच्या तुलनेत सध्या पावणे दोन कोटी रुपयांची घट झाली आहे, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांनी ‘लोकमत’ला दिली.

Daily donation of Rs 4 lakh to Saibaba Sansthan; A reduction of Rs | साईबाबा संस्थानला रोज चार लाखांची देणगी; पावणे दोन कोटींची घट

साईबाबा संस्थानला रोज चार लाखांची देणगी; पावणे दोन कोटींची घट

googlenewsNext

प्रमोद आहेर । 
शिर्डी : लॉकडाऊनच्या काळात साईसंस्थानला आॅनलाईनच्या माध्यमातून रोज सरासरी चार लाख  रुपयांची देणगी मिळत आहे. इतरवेळी प्रत्यक्षपणे रोज मिळणा-या देणगीच्या तुलनेत सध्या पावणे दोन कोटी रुपयांची घट झाली आहे, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरूण डोंगरे यांनी ‘लोकमत’ला दिली.
देशातील श्रीमंत देवस्थान अशी ख्याती असलेल्या साईसंस्थानला कोरोनाने आर्थिक संकटात टाकले आहे. संस्थानचे वर्षाचे उत्पन्न सरासरी ६८० कोटी तर खर्च ६०० कोटी आहे. मे अखेर संस्थानच्या देणगीत सव्वाशे कोटी रुपयांची घट झाली आहे. साईसंस्थानकडे कायम व कंत्राटीसह जवळपास सहा हजार कर्मचारी आहेत. वर्षाला पगार आणि बोनसपोटी संस्थानचे १८७ कोटी तर दिवसाला ५० लाख रूपये खर्च होतात. 
संस्थान प्रसादालयात मोफत अन्नदान करते. यावर वर्षाला ४० कोटींचा खर्च होतो. संस्थानचे दोनपैकी एक रूग्णालय पूर्णपणे मोफत आहे. गेल्या वर्षी या रूग्णालयातून ४८ कोटींचे उत्पन्न मिळाले तर १२० कोटी रुपये खर्च झाले. 
दुर्धर आजारासाठी गेल्या वर्षभरात ७१४ गरीब रूग्णांना तब्बल सतरा कोटी रूपये मदत पाठविण्यात आली. संस्थानच्या शैक्षणिक संकुलात पाच हजारांवर विद्यार्थी आहेत. मुलींना मोफत शिक्षण आहे. संस्थानचे शिक्षणावर १४ कोटी खर्च होतात. मात्र या उपक्रमातून फक्त अडीच कोटी रुपये जमा होतात. भक्त निवासामध्ये दरवर्षी अडीच कोटींचा तोटा होतो. दर्शन रांगेत बुंदी प्रसादावरच वर्षभरात वीस कोटी रुपये खर्च होतात. याशिवाय रांगेत भाविकांना चहा, बिस्कीटेही मोफत दिली जातात. महिन्याला वीज बील एक कोटीपेक्षा जास्त असते. स्वच्छतेवरही मोठा खर्च होतो. नगरपंचायतीला सुद्धा स्वच्छता व अन्य विकास कामांना मदत केली जाते.
मागील वर्षी ५१ कोटींची देणगी
मागील वर्षी १७ मार्च ते ३१ मे २०१९ दरम्यान देणगीद्वारे ५१ कोटी ३१ लाख रोख रक्कम, दीड कोटीचे सोने-चांदी, दर्शन-आरती पासेसमधून साडेआठ कोटी रूपये मिळाले होते. यंदा या काळात फक्त तीन ते साडेतीन कोटी रूपये मिळण्याची शक्यता मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांनी व्यक्त केली़.
 

Web Title: Daily donation of Rs 4 lakh to Saibaba Sansthan; A reduction of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.