ट्रस्टने देऊ केलेली तोकडी पगारवाढ कामगारांनी फेटाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:23 AM2021-02-24T04:23:34+5:302021-02-24T04:23:34+5:30

यावेळी लालबावटाचे सचिव अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, युनिट अध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष ...

The cut-off offered by the trust was rejected by the workers | ट्रस्टने देऊ केलेली तोकडी पगारवाढ कामगारांनी फेटाळली

ट्रस्टने देऊ केलेली तोकडी पगारवाढ कामगारांनी फेटाळली

Next

यावेळी लालबावटाचे सचिव अ‍ॅड. कॉ. सुधीर टोकेकर, युनिट अध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष संजय कांबळे, विजय भोसले, अनिल फसले, सुभाष शिंदे, सुनिल दळवी, राधाकिसन कांबळे, प्रभा पाचारणे, सुनिता जावळे, किशोर कांबळे, प्रविण भिंगारदिवे आदींसह कामगार उपस्थित होते.

अवतार मेहेरबाबा ट्रस्टच्या कामगारांची वेतन कराराची मुदत मार्च २०२० मध्ये संपली असताना नवीन करार करुन महागाई निर्देशांकानुसार वेतन मिळण्याची मागणी लाल बावटा (आयटक) संलग्न कामगार युनियनने लावून धरली आहे. ट्रस्ट कामगारांना वेतनवाढ देण्यासाठी आडमुठीपणाची भूमिका घेत असल्याचा आरोप युनियनने केला आहे. सदर प्रकरणी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात प्रकरण चर्चेने सोडविण्यासाठी सात ते आठ तारखा झाल्या. यापैकी मोजक्या तारखांना विश्‍वस्तांनी हजेरी लावून कामगारांना दरमहा एक हजार चारशे पहिल्या वर्षीसाठी, दुसर्‍या वर्षी दोन हजार आठशे व तीसर्‍या वर्षी चार हजार दोनशे अशा टप्प्याटप्यांनी वाढ देण्यास सहमती दर्शवली. कामगारांनी ट्रस्टचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. अपेक्षित पगारवाढ करावी, अशी कामगारांची मागणी आहे.

फोटो २४ आंदोलन

ओळी- अवतार मेहेरबाबा कामगार युनियनच्यावतीने कामगारांच्या पगारवाढीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

Web Title: The cut-off offered by the trust was rejected by the workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.