तहसीलदारांकडे खंडणी मागितल्याने सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:15 AM2021-06-22T04:15:49+5:302021-06-22T04:15:49+5:30

पारनेर : वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार नाही, असे म्हणत पारनेरच्या तहसीलदारांकडे ५० हजार रुपयांची खंडणी ...

Crime on social worker for demanding ransom from tehsildar | तहसीलदारांकडे खंडणी मागितल्याने सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा

तहसीलदारांकडे खंडणी मागितल्याने सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा

Next

पारनेर : वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करणार नाही, असे म्हणत पारनेरच्या तहसीलदारांकडे ५० हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्यावर सोमवारी (दि.२१) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे खंडणी मागितल्या प्रकरणी अन्याय निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रामदास रोडे याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांनी सोमवारी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. धोत्रे बुद्रूक येथील अरुण रामदास रोडे हा मागील आठवड्यात त्याच्या मित्राचे वाळूचे पकडलेले वाहन सोडविण्यासाठी तहसीलदार देवरे यांच्याकडे गेला होता. सोमवारी (दि. २१) दुपारी अरुण रोडे पुन्हा तहसीलदारांच्या दालनात आला. तुमच्या विरोधात वाळूच्या तक्रारी करायच्या नसतील तर ५० हजार रुपये द्या, अशी मागणी त्याने देवरे यांच्याकडे केली. देवरे यांनी त्याला ३० हजार रुपये घेऊन जा, असे सांगून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ येऊन त्याला ताब्यात घेतले. मी सुटून आल्यानंतर एकेकाला सोडणार नाही, अशी धमकीही रोडे याने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अरुण रोडे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप करीत आहेत.

पारनेर तालुक्यात सुरू असलेल्या वाळू उपशाविरोधात रोडे याने वरिष्ठ पातळीवर तक्रारी केल्या होत्या. महसूलमंत्री यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्याने दिला होता.

Web Title: Crime on social worker for demanding ransom from tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.