कोरोनाची रुग्णसंख्या निम्म्याने घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:22 AM2021-05-18T04:22:49+5:302021-05-18T04:22:49+5:30

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची दैनंदिन रुग्णसंख्या निम्म्याने घटली. दररोज येणारी चार हजारांऐवजी सोमवारी २१०५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह ...

Corona's patient population halved | कोरोनाची रुग्णसंख्या निम्म्याने घटली

कोरोनाची रुग्णसंख्या निम्म्याने घटली

Next

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची दैनंदिन रुग्णसंख्या निम्म्याने घटली. दररोज येणारी चार हजारांऐवजी सोमवारी २१०५ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. पॉझिटिव्हपेक्षा बरे होेणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली असून, ४,०५२ जणांना घरी सोडण्यात आले. रुग्णसंख्या घटल्याने उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्याही २० हजारांपर्यंत खाली आली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३८०, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८६३ आणि अँटिजेन चाचणीत ८६२ रुग्णबाधित आढळले. नगर शहरातील रुग्णसंख्याही कमालीची घटली आहे. सोमवारी शहरात १२९ जण बाधित आढळले. जिल्ह्यात राहाता (१००), संगमनेर (१५१), श्रीरामपूर (९४), नेवासे (१७५), नगर तालुका (२०२), पाथर्डी (२१३), अकोले (२०५), कोपरगाव (१७४), कर्जत (६८), पारनेर (१२९), राहुरी (१५३), भिंगार शहर (२४), शेवगाव (१२४), जामखेड (५२), जामखेड (५२), श्रीगोंदा (७८), इतर जिल्हा (३३) असे एकूण २१०५ जण बाधित झाले. जिल्ह्यात २४ तासांत ७ जणांचा मृत्यू झाल्याची पोर्टलवर नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता २ लाख ३३ हजार ७४० इतकी झाली आहे.

Web Title: Corona's patient population halved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.