कोरोनामुळे केडगावला साधेपणाने विधीवत घटस्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 12:33 PM2020-10-17T12:33:23+5:302020-10-17T12:34:15+5:30

नगर शहरातील केडगावच्या रेणुकामाता मंदिरात कोरोनाच्या सावटामुळे साधेपणाने विधीवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. मंदिराबाहेर यंदा भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन तसेच मुखदर्शनाची सुविधा करण्यात येत आहे. देवी भक्तांविना केडगाव देवीचा मंदिर परिसर आज सुना -सुना दिसत होता.

Corona simply marries Kedgaon | कोरोनामुळे केडगावला साधेपणाने विधीवत घटस्थापना

कोरोनामुळे केडगावला साधेपणाने विधीवत घटस्थापना

googlenewsNext

अहमदनगर : श्रद्धास्थान असणाऱ्या केडगावच्या रेणुकामाता मंदिरात कोरोनाच्या सावटामुळे साधेपणाने विधीवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. मंदिराबाहेर यंदा भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन तसेच मुखदर्शनाची सुविधा करण्यात येत आहे. देवी भक्तांविना केडगाव देवीचा मंदिर परिसर शनिवारी सुना -सुना दिसत होता.

केडगावच्या रेणुकामंदिरात शनिवारी सकाळी ६ वाजता अभिषेक करण्यात आला. मंदिर परिसरातील मंगळाई देवी, भवानी गुरव यांच्या पादुका, भैरवनाथ मंदिर पूजन, परशुराम पूजन झाल्यानंतर केडगावमधील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल महाराज कोतकर यांच्या हस्ते विधीवत पूजा होऊन सपत्निक घटस्थापना करण्यात आली.

यावेळी महाआरती करण्यात आली. देविला पारंपारिक आभुषणे परिधान करण्यात आली होती. मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पुजारी राजू गुरव, राम गुरव, शंकर कदम, शेखर गुरव, सुनील गुरव आदिंनी पौराहित्य केले.

मंदिर परिसरात भाविकांना मज्जाव असला तरी मंदिरात सालाबादप्रमाणे घटस्थापना, दोन वेळा आरती, ललित पंचमीला कुंकुम आर्चन, सातव्या माळेला फुलोराचा नैवेद्य, नवमीला होमहवण, दसऱ्याला शस्त्र पूजन आदि धार्मिक विधी नियमाप्रमाणे होणार आहेत.

Web Title: Corona simply marries Kedgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.