लस घेतलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यासह पाच कर्मचाऱ्यांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:25 AM2021-03-01T04:25:36+5:302021-03-01T04:25:36+5:30

श्रीगोंदा : तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यातील कोरोना लस घेतलेल्या एका अधिकाऱ्यासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत ...

Corona to five employees, including a police officer who was vaccinated | लस घेतलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यासह पाच कर्मचाऱ्यांना कोरोना

लस घेतलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यासह पाच कर्मचाऱ्यांना कोरोना

Next

श्रीगोंदा : तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यातील कोरोना लस घेतलेल्या एका अधिकाऱ्यासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर म्हणाले, काही दिवसांपूर्वी बेलवंडी पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांना त्रास जाणवला. कोरोना चाचणी केल्यानंतर त्यात पाच कर्मचारी व अधिकारी काेरोना बाधित आढळले. यात एक महिला कर्मचारी आहे. मात्र सगळ्यांची प्रकृती चांगली असून सर्वांना होम क्वारंटाईन केले आहे.

लस घेतल्यानंतरही ते कोरोनाबाधित कसे झाले यावर डॉ. खामकर म्हणाले, लस घेतल्यानंतर १५ ते २० दिवसानंतर त्या लसीचा परिणाम दिसून येतो. मात्र लस घेतल्यानंतर पहिल्याच आठवड्यात हे पोलीस कर्मचारी बाधित आढळले आहेत. त्यामुळे लस घेण्याचा त्यांच्यावर परिणाम होण्याअगोदरच कोरोना पॉझिटिव्ह आले.

पोलीस निरीक्षक संपत शिंदे म्हणाले, पोलिसांना कामाचा ताण जास्त आहे. त्याही परिस्थितीत सगळे जण मास्क लावून व सॅनिटायझर बाळगून दक्षता घेत आहेत. सगळ्या पोलिसांना लस दिली असून काही दिवस काळजी घेणे आवश्यक आहे.

त्यादृष्टीने आम्ही पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पोलीस ठाण्यात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Corona to five employees, including a police officer who was vaccinated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.