इंग्रजी सुधारणा प्रकल्पातील पहिल्या प्रयोगाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:22 AM2021-01-20T04:22:21+5:302021-01-20T04:22:21+5:30

अहमदनगर : ग्लोबलनगरी फाउंडेशन आणि जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळांमधील मुलांची इंग्रजी सुधारण्यासाठी आयोजित केलेल्या ...

Conclusion of the first experiment in the English Improvement Project | इंग्रजी सुधारणा प्रकल्पातील पहिल्या प्रयोगाची सांगता

इंग्रजी सुधारणा प्रकल्पातील पहिल्या प्रयोगाची सांगता

Next

अहमदनगर : ग्लोबलनगरी फाउंडेशन आणि जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळांमधील मुलांची इंग्रजी सुधारण्यासाठी आयोजित केलेल्या उपक्रमाचा पारितोषिक वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला.

शिरीष साठे आणि मीरा ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली १६ जानेवारी रोजी झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे सीईओ राजेंद्र क्षीरसागर, सहकार आयुक्त अनिल कवडे, जालन्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, उपसंचालक रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे, ग्लोबलनगरी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर गोरे यांच्यासह स्वयंसेवक व जिल्हा परिषदेचे शिक्षक सहभागी झाले होते. गेल्या चार महिन्यांपासून हा उपक्रम सुरू होता. यात सहभागी झालेले ५७ शिक्षक, त्यांची इंग्रजी भाषा सुधारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेले ग्लोबलनगरीचे जगभरातील विविध देशांतील ५२ ट्युटर्स आणि त्यांच्यासोबत ग्लोबलनगरी फाउंडेशनचे सदस्य सहभागी झाले होते. या प्रकल्पाचे प्रमुख सूत्रधार अविनाश मेहेत्रे यांनी सूत्रसंचालन केले.

इंग्रजी जागतिक भाषा तर आहेच; परंतु भारतातही ही कामकाजाची भाषा असल्याने त्यावर प्रभुत्व मिळविणे गरजेचे आहे. आपण शाळेत इंग्रजी शिकतो किंवा शिकवितो; परंतु योग्य मार्गदर्शन कमी पडते. याच धर्तीवर शाळेचा दर्जा सुधारावा या तळमळीतून ग्लोबलनगरी फाउंडेशनने जिल्हा परिषद उपक्रमाच्या अंतर्गत हा इंग्रजी भाषा सुधारणा प्रोजेक्ट जून २०२० मध्ये सुरू केला होता. अनिल कवडे, राजेंद्र क्षीरसागर आणि शिवाजी शिंदे यांनी विचार मांडले आणि ग्लोबलनगरीच्या कार्याचे कौतुक केले. शेवटी या उपक्रमासाठी परिश्रम घेतलेल्या शिक्षकांचा डिजिटल प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

Web Title: Conclusion of the first experiment in the English Improvement Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.