पुलाची रंगरंगोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:15 AM2021-06-19T04:15:38+5:302021-06-19T04:15:38+5:30

पावसाची हजेरी अहमदनगर : शहरासह उपनगरांत शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. तपोवन रोड, भिस्तबाग चौक, पाईपलाईन ...

The color of the bridge | पुलाची रंगरंगोटी

पुलाची रंगरंगोटी

Next

पावसाची हजेरी

अहमदनगर : शहरासह उपनगरांत शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. तपोवन रोड, भिस्तबाग चौक, पाईपलाईन रोड, कुष्ठधाम परिसरात झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. सकाळी वातावर निरभ्र होते. त्यामुळे घरातून निघताना अनेकांनी रेनकोट व छत्रीबरोबर आणली नव्हती. अचानक झालेल्या पावसामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला.

.....

मनपात शिपायाची मुजोरी

अहमदनगर: महापालिकेच्या स्वच्छता विभागातील शिपाई पदावर कार्यरत असलेल्या कर्मचारी अन्य विभागात बदली करण्यात आली आहे. परंतु, हा कर्मचारी बदलीच्या ठिकाणी अद्याप हजर झाला नाही. ते पूर्वीच्याच विभागात काम करत असून, ही बदली रद्द करण्यासाठी नगरसेवकांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

.....

खतांचा तुटवडा कायम

अहमदनगर : पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकासह उसाला रासायनिक खतांची मात्रा देण्यासाठी शेतकरी खतांची मागणी करत आहेत. परंतु खते मिळत नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. खतासाठी प्रतीक्षा यादी तयार करण्यात येत आहेत.

.....

पालिकेच्या प्रवेशव्दारात पाण्याचे डबके

अहमदनगर: महापालिकेच्या औरंगाबाद रोडवरील प्रशासकीय इमारतीला नगररचना विभागाच्या बाजूने प्रवेशव्दार आहे. या प्रवेशव्दारातच पाण्याचे मोठे डबके साचले आहे. त्यामुळे अभ्यंगतांची गैरसोय होत असून, याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले आहे.

.....

गाडेकर चौकात रस्त्याचे काम सुरू

अहमदनगर : सावेडी उपनगरातील निर्मलनगर येथील मुळे एसस्टीडी ते गाडेकर चौक रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्ता खोदण्यात आला असून, खडीकरून डांबरीकरण करण्यात येणार आहे.

.....

गटार नसल्याने पाणी रस्त्यावर

अहमदनगर: सावेडी उपनगरातील पाईपलाईन रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटार तयार करण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असून, बुधवारी दुपारी झालेल्या पावसामुळे या रस्त्याला नाल्याचे स्वरुप आले होते.

.....

Web Title: The color of the bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.