संविधान दिनानिमित्ताने संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 01:09 PM2020-11-26T13:09:28+5:302020-11-26T13:10:30+5:30

अहमदनगर : - मानवाधिकार अभियान आणि महाराष्ट्र शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संधोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)  यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिम्मित्ताने मार्केटयार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास  अभिवादन करण्यात आले.

Collective reading of the Constitution Objectives on the occasion of Constitution Day | संविधान दिनानिमित्ताने संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन

संविधान दिनानिमित्ताने संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन

googlenewsNext

अहमदनगर : - मानवाधिकार अभियान आणि महाराष्ट्र शासनाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संधोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)  यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिम्मित्ताने मार्केटयार्ड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास  अभिवादन करण्यात आले.

 

यावेळी संविधान जागरासाठी अहमदनगर जिल्ह्यातील विविध पुरोगामी संस्था संघटना एकत्रित येवून प्रत्येक वर्षी संविधान दिनानिमित्ताने संविधान जागर रॅलीचे आयोजन करत असतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमाचे पालन व्हावे या दृष्टीकोनातून संविधान जागर रॅली रद्द करण्यात आली व साधेपणाने संविधान दिन साजरा केला गेला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करत संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. तसेच मानवाधिकार अभियानाचे मुखपत्र संविधान पत्रिकेच्या या पाक्षिकाच्या पहिल्या अंकाचे उद्घाटन आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मानवाधिकार आभियानाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. संतोष गायकवाड, संध्याताई मेढे, रुपाली वाघमारे, युनिसभाई तांबटकर, दीपक अमृत, सत्यशील शिंदे, बापू विधाते, संजय कांबळे, जालिंदर बोरुडे, अविनाश भोसले, आशा हरे, हर्षल कांबळे’ अमित धाडगे, विठ्ठल कोतकर, तसेच बार्टी कार्यालय मार्फत प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद, समतादूत एजाज पिरजादे, प्रेरणा विधाते, सुलतान सय्यद, संतोष शिंदे, विशाल गायकवाड, सविता सकट, किरण चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Collective reading of the Constitution Objectives on the occasion of Constitution Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.