Collect 20 kg of ice from the sky | आकाशातून पडला २० किलो बर्फाचा गोळा
आकाशातून पडला २० किलो बर्फाचा गोळा

माळवाडगांव : श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगांव येथे आज दुपारी १२ च्या सुमारास माळवाडगांव येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी आकाशातून बर्फाचे गोळे पडले.
याबाबत अधिक माहीती अशी, माळवाडगांव येथील हरेगांव रोडलगत शरद तुकाराम शेरकर यांची गट नं.६५ मध्ये जमीन आहे. त्या शेजारीच २० ते २५ महिला कांदा लावण्याचे काम करत होत्या. त्यावेळेस त्यांना हवेतून काहीतरी आल्याचा आवाज आला. तेव्हा त्यांनी आकाशाकडे पाहीले असता त्यांना दक्षिण दिशेकडून पांढ-या रंगाचा गोळा जमिनीच्या दिशेने आल्याचे दिसले. परंतु काही महीलांचा समज झाला कि विमान चालले असावे. परंतु काही क्षणातच हा गोळा अत्यंत वेगात येऊन शेरकर यांच्या शेतात आदळला. गोळा जमिनीवर पडताच मोठा आवाज झाला. त्यामुळे तेथील जमावाने गोळ््याजवळ जावून पाहीले. असता बर्फाचा मोठा गोळा जमिनीवर पडलेला होता. गोळा जमिनीवर पडल्याने बर्फाचे तुुकडे झाले होते.
तर दुस-या ठिकाणी माळवाडगांव येथील खळवाडीमध्ये शरद शंकर आसने यांच्या घरासमोर त्यांचा मुलगा प्रमोद काम करत होता. त्याच्यासमोर त्याच्यासमोर अवघ्या ५ फुटावर एक २०० ते ४०० ग्रँमचा बर्फाचा गोळा पडला. आज आकाशात कुठेही ढग नाही. पावसाचे वातावरण नाही तर हा बफार्चा गोळा आला कुठुन याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


Web Title: Collect 20 kg of ice from the sky
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.