सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना: अध्यक्षपदी बाबा ओहोळ, उपाध्यक्षपदी संतोष हासे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 04:09 PM2020-02-29T16:09:15+5:302020-02-29T16:09:23+5:30

संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रताप उर्फ बाबा पुंजाजी ओहोळ यांची तर उपाध्यक्षपदी संतोष रखमा हासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शनिवारी कारखान्याच्या अतिथीगृहात कारखान्याचे मागदर्शक , कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली. 

Co-Founder Sugar Bhusaheb Thorat Co-operative Sugar Factory: Baba Ohol, President, Santosh Hasse | सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना: अध्यक्षपदी बाबा ओहोळ, उपाध्यक्षपदी संतोष हासे 

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना: अध्यक्षपदी बाबा ओहोळ, उपाध्यक्षपदी संतोष हासे 

googlenewsNext

संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी प्रताप उर्फ बाबा पुंजाजी ओहोळ यांची तर उपाध्यक्षपदी संतोष रखमा हासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शनिवारी कारखान्याच्या अतिथीगृहात कारखान्याचे मागदर्शक , कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत ही निवड करण्यात आली. 
   कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ यांनी अध्यक्षपदासाठी ओहोळ यांच्या नावाच्या मांडलेल्या सुचनेला संचालक इंद्रजीत खेमनर यांनी तर संचालक गणपत सांगळे यांनी उपाध्यक्षपदासाठी हासे यांच्या नावाच्या मांडलेल्या सुचनेला संचालक तुषार दिघे यांनी अनुमोदन दिले. कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक इंद्रजित थोरात, चंद्रकांत कडलग, मिनानाथ वर्पे, भाऊसाहेब शिंदे, संपतराव गोडगे, दादासाहेब कुटे, रोहिदास पवार, विनोद हासे, अनिल काळे, भास्कराव आरोटे, माणिक यादव, अभिजीत ढोले, मिरा वर्पे, मंदा वाघ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यावेळी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत मंगळुरे यांनी अध्यक्षपदी ओहोळ तर उपाध्यक्षपदी हासे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. 
   कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष, मंत्री थोरात म्हणाले, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना तालुक्याची कामधेनू आहे. कारखान्याचे मावळते अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब कुटे यांनी मागील काळात कारखाना अतिशय सक्षमपणे चालविला. कारखान्याच्या संचालक मंडळात नव्या चेहºयांना संधी देताना अध्यक्षपदी ओहोळ तर उपाध्यक्षपदी हासे यांची निवड करण्यात आली. तालुक्यातील सर्वच सहकारी संस्था चांगल्या उत्तमरित्या सुरू आहेत. कारखान्याची निवडणुक बिनविरोध झाली. सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, नागरिक या सर्वांचेच कारखान्यावर मोठे प्रेम असुन नव्या पदाधिकाºयांना चांगल्या सहकाराचा समृध्द वारसा पुढे चालवायचा आहे. असेही थोरात म्हणाले. 
   आमदार डॉ. सुधीर तांबे, शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, कारखान्याचे मावळते अध्यक्ष अ‍ॅड. माधवराव कानवडे, उपाध्यक्ष लक्ष्मणराव कुटे, उद्योजक राजेश मालपाणी, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, महानंदाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, रामदास वाघ, अमित पंडीत, शिवाजीराव थोरात, शंकरराव खेमनर, इंद्रजित थोरात, भाऊसाहेब कुटे, हरिभाऊ वर्पे, साहेबराव गडाख, संपतराव डोंगरे, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे, मिरा शेटे, सुनंदा जोर्वेकर, विश्वास मुर्तडक, सुधाकर रोहम, रामहरी कातोरे, सुरेश थोरात, अर्चना बालोडे, हौशीराम सोनवणे, अविनाश सोनवणे, विष्णुपंत रहाटळ  हे देखील यावेळी उपस्थित होते. त्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाºयांच्या निवडीचे कौतुक केले. 
-----------------

Web Title: Co-Founder Sugar Bhusaheb Thorat Co-operative Sugar Factory: Baba Ohol, President, Santosh Hasse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.