जंतनाशक गोळी दिल्यानंतर चिमुरडीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:24 AM2021-03-09T04:24:26+5:302021-03-09T04:24:26+5:30

मयत बालिकेची उत्तरीय तपासणी येथील जिल्हा रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. ...

Chimurdi dies after being dewormed | जंतनाशक गोळी दिल्यानंतर चिमुरडीचा मृत्यू

जंतनाशक गोळी दिल्यानंतर चिमुरडीचा मृत्यू

googlenewsNext

मयत बालिकेची उत्तरीय तपासणी येथील जिल्हा रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. लोणी सय्यद मीर येथे जिल्हा आरोग्य यंत्रणेचे उपकेंद्र आहे. हे केंद्र बंद असल्याने जंतनाशक गोळ्या गावातील मारुती मंदिरात आशा सेविकांनी वाटल्या होत्या. प्रांजल हिला पूर्ण गोळीतील अर्धी गोळी दिली होती. तिला गोळी दिल्यानंतर ती जमिनीवर कोसळली. त्यानंतर तिला गावातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून नगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु तिथे उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदनाचा अहवालातच मृत्यूचे कारण समोर येणार असून ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी प्रांजल हिच्या नातेवाइकांची भेट घेत सांत्वन केले. तसेच या घटनेबाबत शासकीय स्तरावरून चौकीशीची मागणी त्यांनी केली.

Web Title: Chimurdi dies after being dewormed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.