मुख्यमंत्र्यांनी विधान मागे घ्यावे,राधाकृष्ण विखे : साईबाबा जन्मस्थळाचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 08:14 PM2020-01-18T20:14:41+5:302020-01-18T20:14:46+5:30

शिर्डी : मुख्यमंत्र्यांनी साई जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे घेऊन स्पष्टीकरण द्यावे. यातून करोडो भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यावर फुंकर घालावी, असे आवाहन माजी विरोधी पक्षनेते व शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्निवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले़

The Chief Minister should withdraw the statement | मुख्यमंत्र्यांनी विधान मागे घ्यावे,राधाकृष्ण विखे : साईबाबा जन्मस्थळाचा वाद

मुख्यमंत्र्यांनी विधान मागे घ्यावे,राधाकृष्ण विखे : साईबाबा जन्मस्थळाचा वाद

Next


शिर्डी : मुख्यमंत्र्यांनी साई जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे घेऊन स्पष्टीकरण द्यावे. यातून करोडो भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यावर फुंकर घालावी, असे आवाहन माजी विरोधी पक्षनेते व शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्निवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले़
विखे म्हणाले, जन्मस्थळाबाबत जे दावे केले जातात. त्याला पाठबळ देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करू नये. या संदर्भात शासन समिती नेमण्याच्या विचारात आहे. त्यास आपला पूर्ण विरोध असून त्याची आवश्यकताच नाही. साईबाबांनी कधी जात- धर्म सांगितला नाही. साईसच्चरित्रातही तसा उल्लेख नाही़ अनेक प्रयत्न करून तो ब्रिटिशांनाही शोधता आला नाही़ त्यामुळे ते जगभर सर्वधर्म समभावाचे प्रतिक बनले आहेत़ पाथरीला निधी देण्यास आमचा विरोध नाही. मात्र तो जन्मस्थळाच्या नावाने देऊ नये. आजवर साईबाबांच्या जन्मस्थळाचे अनेक दावे करण्यात आले, त्यात कोणतेही तथ्य आढळले नाही. तरीही वारंवार दावे करण्यात येतात, यामागे काहीतरी षड्यंत्र आहे. पाथरीकरांकडे २९ पुरावे आहेत तर इतक्या दिवस त्यांनी ते का पुढे आणले नाहीत?त्यांनी हा वाद वाढवू नये.यावेळी कैलास कोते, शिवाजी गोंदकर, राजेंद्र गोंदकर, सुजीत गोंदकर, रवींद्र कोते, नितीन कोते, दत्तात्रय कोते, हरिश्चंद्र कोते, पोपट श्ािंदे, जगन्नाथ गोंदकर, सचिन शिंदे, साईराज कोते, विलास कोते, गणेश कोते, मधुकर कोते  उपस्थित होते.
----------
चुकीची माहिती कोण देतो
राष्ट्रपतीनींही असाच उल्लेख केला होता. याबाबत त्यांना शिर्डीकरांनी भेटून माहिती दिली होती. त्यानंतर ते पाथरीला गेले नाहीत़ राष्ट्रपती असो की मुख्यमंत्री, त्यांना चुकीची माहिती कोण देतो? याचाही शोध घेण्याची वेळ आली आहे़ साईसंस्थानला नुकतीच दाभोळकरांच्या नातीने साईसच्चरित्राची मुळ प्रत भेट दिली आहे़ त्या प्रतीचे पुनर्प्रकाशन करून तिच प्रत आधारभूत मानून तिचेच अन्य भाषेत भाषांतर करावे. त्यामुळे वारंवार असे प्रकार होणार नाहीत. त्यासाठी संस्थानने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही विखे यांनी केले़ वेळेत समाधानकारक तोडगा निघाला नाही तर बंद मागे घ्यायचा की बेमुदत सुरू ठेवायचा ते ग्रामसभा ठरवेल व त्याला आपला पाठिंबा असेल असेही विखे म्हणाले़
---
बंद काळात अत्यावश्यक सेवा सुरु 
बंद काळात साईमंदिर, प्रसादालय, भक्तनिवास, रूग्णालये, मेडिकल अशा अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत़ तर हार-फुलांची व अन्य दुकाने, शॉपिंग कॉम्प्लेक्स आदी बंद राहणार आहे़
--
सध्या अनेक शिर्डीकर व्हॉटस अ‍ॅप स्टेटसला साईबाबांचा फोटो ठेवत आहेत़ राधाकृष्ण विखे यांनी आजवर स्टेटसला कधीही कोणताही फोटो ठेवला नाही़ त्यांनी प्रथमच आज साईबाबांचा फोटो ठेवून ग्रामस्थांच्या आंदोलनात साईभक्त म्हणून उतरल्याचा संदेश दिला़
--
दाभोळकर लिखित मूळ साईसच्चरित्रात जन्मस्थळाचा उल्लेख नाही. संस्थानने मराठी ग्रंथाच्या आजवर ३६ आवृृत्या काढल्या, त्यातील आठव्या आवृत्तीत हा उल्लेख असल्याचे पाथरीकर सांगतात, मात्र हा उल्लेख या आवृत्तीत घुसडण्यात आला होता़ नंतरच्या आवृत्तीत तो काढण्यात आला़ भाषांतरे करतांनाही संस्थानच्या दुर्लक्षाने तो काही आवृत्तीत छापला गेला, असे विखे यांनी स्पष्ट केले.

Web Title: The Chief Minister should withdraw the statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.