केंद्रीय कृषी विधेयक रद्द करा मागणीसाठी छात्रभारतीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 02:45 PM2020-12-02T14:45:48+5:302020-12-02T14:46:30+5:30

केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयक रद्द करा, या मागणीसाठी पंजाब व हरियाणा या राज्यांतील शेतक-यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. बुधवारी (दि.२) संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संगमनेर बसस्थानक, प्रांतकचेरीबाहेर आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

Chhatrabharati's agitation for repeal of Central Agriculture Bill | केंद्रीय कृषी विधेयक रद्द करा मागणीसाठी छात्रभारतीचे आंदोलन

केंद्रीय कृषी विधेयक रद्द करा मागणीसाठी छात्रभारतीचे आंदोलन

Next

संगमनेर : केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयक रद्द करा, या मागणीसाठी पंजाब व हरियाणा या राज्यांतील शेतक-यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्यावतीने पाठिंबा देण्यात आला. बुधवारी (दि.२) संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संगमनेर बसस्थानक, प्रांतकचेरीबाहेर आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

या आंदोलनात सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. निशा शिवुरकर, नगरसेवक हिरालाल पगडाल, अ‍ॅड. नईम इनामदार, छात्रभारतीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत घुले, जिल्हा कायार्ध्यक्ष तुषार पानसरे, प्रशांत काकड,  तालुकाध्यक्ष राधेश्याम थिटमे,  तृप्ती जोर्वेकर, गणेश जोंधळे, सागर गुंजाळ, दीपाली कदारे, राहुल ज-हाड, हर्षल कोकणे, संदीप आखाडे, शीतल रोकडे यांनी सहभाग घेतला.

Web Title: Chhatrabharati's agitation for repeal of Central Agriculture Bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.