महापरीक्षा पोर्टलमधून परीक्षेचे सीसीटीव्ही फुटेज मिळेना; तलाठी भरती सापडली वादात  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2020 02:48 AM2020-10-27T02:48:32+5:302020-10-27T02:49:06+5:30

Exam News : शासनाच्या महाआयटी विभागाकडून या उमेदवारांच्या परीक्षेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होत नसून घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असण्याची शक्यता आहे.

CCTV footage of the exam was not available from the Mahapariksha portal; Talathi recruitment found in dispute | महापरीक्षा पोर्टलमधून परीक्षेचे सीसीटीव्ही फुटेज मिळेना; तलाठी भरती सापडली वादात  

महापरीक्षा पोर्टलमधून परीक्षेचे सीसीटीव्ही फुटेज मिळेना; तलाठी भरती सापडली वादात  

Next

अहमदनगर - भाजप सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेल्या महापरीक्षा पोर्टलमार्फत घेण्यात आलेल्या तलाठी पदाच्या परीक्षेत डमी विद्यार्थी बसल्याचे आढळून आले आहे. शासनाच्या महाआयटी विभागाकडून या उमेदवारांच्या परीक्षेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध होत नसून घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असण्याची शक्यता आहे.

 या पोर्टलमार्फत जुलै २०१९ मध्ये परीक्षा घेण्यात आली. पात्र ठरलेल्यांना २६  जिल्ह्यांत नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने ८४ जागांवर नियुक्ती देण्यासाठी व प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी २३६ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली. यामध्ये १४ उमेदवारांच्या प्रवेश अर्जातील व परीक्षागृहातील स्वाक्षरी आणि छायाचित्रात तफावत आढळून आली. त्यामुळे या २३६ उमेदवारांच्या परीक्षेचे सीसीटीव्ही फुटेज नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी शासनाच्या महाआयटी विभागाकडे मागितले. मात्र ते उपलब्ध झालेले नाही. भरतीचे काम पाहिलेल्या यूएसटी ग्लोबल या खासगी कंपनीने केवळ चौदा संशयित उमेदवारांचा अहवाल दिला आहे. त्यात पाच उमेदवारांचे फुटेजच आढळले नाही, ७ ऑक्टोबरला महाआयटी विभागाच्या संचालकांना पुन्हा पत्र पाठविले. मात्र ही माहिती अद्याप मिळालेली नाही. दरम्यानच्या काळात  द्विवेदी यांची बदली झाली आहे.
 एमपीएससीने बंदी आणलेले काही उमेदवार गुणवत्ता यादीत आले आहेत. नगरला आक्षेपार्ह आढळलेले १४ उमेदवार हे एकाच प्रवर्गाचे व एकाच जिल्ह्यातील आहेत.

Web Title: CCTV footage of the exam was not available from the Mahapariksha portal; Talathi recruitment found in dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.