जामखेडमध्ये रेशनिंगच्या तांदुळाचा ट्रक पकडला; दोन जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 04:17 PM2020-05-29T16:17:20+5:302020-05-29T16:18:43+5:30

जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील २४ टन तांदूळाचा ट्रक काळ्या बाजारात गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी जात असताना चापडगाव शिवारात जामखेड पोलिसांनी गुरुवारी (दि.२८ मे) पकडला. ट्रक चालकासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

Caught rationing rice truck in Jamkhed; Two arrested | जामखेडमध्ये रेशनिंगच्या तांदुळाचा ट्रक पकडला; दोन जणांना अटक

जामखेडमध्ये रेशनिंगच्या तांदुळाचा ट्रक पकडला; दोन जणांना अटक

googlenewsNext

जामखेड : तालुक्यातील सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील २४ टन तांदूळाचा ट्रक काळ्या बाजारात गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी जात असताना चापडगाव शिवारात जामखेड पोलिसांनी गुरुवारी (दि.२८ मे) पकडला. ट्रक चालकासह दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

 सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील २४ टन तांदूळ गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी सोनेगाव, नान्नज, चोंडी, चापडगाव मार्गे जाणार आहे, अशी खबर पोलीस  उपविभागीय अधिकारी संजय सातव यांना मिळाली होती. यानंतर त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक रवाना केले. गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास चोंडी शिवारात तांदूळाने भरलेला ट्रक (क्रमांक एम.एच.-४५, टी. ७३९६) काळ्या बाजाराने विक्रीसाठी गुजरातकडे निघाला होता.  

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, पोलीस नाईक केशव व्हटकरे, भरत गडकर, आण्णासाहेब कोळेकर, संतोष साबळे, हृदय घोडके, आदित्य बेलेकर, सागर जंगम, लहू खरात यांच्या पथकाने सदर ट्रक अडवला. ट्रक चालक शशिकांत भिमराव गवळी (रा.कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर), सहायक चालक संदीप सुनील लोंढे (रा.बारलोणी, ता.माढा, जि.सोलापूर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदर तांदूळ सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकान चालक मंदा सुग्रीव वायकर यांचा असून तो गुजरात राज्यात घेऊन जात असल्याचे सांगितले. 

सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे यांनी तालुका पुरवठा अधिका-यांना माहिती दिली. यानंतर जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

Web Title: Caught rationing rice truck in Jamkhed; Two arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.