विहिरीत पडलेले ‘ते’ बछडे बिबट्याचे नव्हे; वनविभागाच्या पाहणीनंतर निष्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 02:23 PM2020-10-30T14:23:54+5:302020-10-30T14:45:13+5:30

 जामखेड तालुक्यातील हळगाव येथील एका विहिरीत बिबट्याचे दोन पिल्ले असल्याची खबर गुरूवारी सायंकाळी सोशल मीडियावर वायरल झाली. अन् परिसरातील मोठी खळबळ उडाली होती. परिसरात घबराट पसरली होती.परंतु वनविभागाच्या अधिका-यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन विहिरीतील जंगली प्राण्यांची पाहणी केल्यानंतर ते पिल्ले बिबट्याचे नसल्याचे स्पष्ट झाले. अन् सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. 

The calf in the well is not a leopard; Concluded after Forest Department inspection | विहिरीत पडलेले ‘ते’ बछडे बिबट्याचे नव्हे; वनविभागाच्या पाहणीनंतर निष्पन्न

विहिरीत पडलेले ‘ते’ बछडे बिबट्याचे नव्हे; वनविभागाच्या पाहणीनंतर निष्पन्न

Next

 जामखेड : तालुक्यातील हळगाव येथील एका विहिरीत बिबट्याचे दोन पिल्ले असल्याची खबर गुरूवारी सायंकाळी सोशल मीडियावर वायरल झाली. अन् परिसरातील मोठी खळबळ उडाली होती. परिसरात घबराट पसरली होती.परंतु वनविभागाच्या अधिका-यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन विहिरीतील जंगली प्राण्यांची पाहणी केल्यानंतर ते पिल्ले बिबट्याचे नसल्याचे स्पष्ट झाले. अन् सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. 

 हळगाव येथील शिवाजी ढवळे यांच्या आघी रस्त्यावरील शेतातील विहिरीत गुरूवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास जितु ढवळे या तरूणाला दोन जंगली प्राणी असल्याचे दिसले. बिबट्याचे पिल्ले विहिरीत आढळून आले. ही बातमी सोशल मीडियावर क्षणात वायरल झाली. आठवडाभरापासून पाथर्डी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना उघडकीस आल्याने जनतेत भीती आहे. त्यात ही बातमी समोर आल्याने हळगाव परिसरात मोठी भीती पसरली होती. 

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी सदर घटनेची माहिती वनविभागाला दूरध्वनीवरून कळवली. मिळालेल्या माहितीनुसार वनरक्षक किशोर गांगर्डे यांनी गुरुवारी रात्री साडेदहा वाजता तातडीने हळगावला भेट दिली.  त्यांनी सदर विहिरीची पाहणी केली असता  त्या विहिरीत असलेले पिल्ले हे बिबट्याचे नसून उदमांजराचे असल्याचे निदर्शनास आले. अन् नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

दरम्यान, शुक्रवारी विहिरीत पडलेल्या उदमांजरांच्या दोन पिल्लांना वनविभागाकडून सकाळी यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले. वनरक्षक किशोर गांगर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या पथकात वनमजूर शरद सूर्यवंशी, हरि माळशिकारे, महारनवर, बोबडे बबलू जाधव यांचा समावेश होता. 

Web Title: The calf in the well is not a leopard; Concluded after Forest Department inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.