माझ्या पाठिशी ज्येष्ठांचाही आशीर्वाद-निलेश लंके; निघोजला प्रचारसभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 05:02 PM2019-10-16T17:02:05+5:302019-10-16T17:02:39+5:30

माझ्याबरोबर टुकार मुले फिरतात अशी टीका करून तरुणांना बदनाम केले जात आहे. या तरुणांसह  माझ्या पाठिशी ज्येष्ठांचाही आशीर्वाद आहे. तरुणांची ताकद काय असते ते या निवडणुकीत दिसेल. पारनेर मतदारसंघात परिवर्तनाची लाट नव्हे,  तर त्सुनामी आली आहे, अशी टीका पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी केली.

Blessings of my late senior-Nilesh Lanka; Neighborhood Meeting | माझ्या पाठिशी ज्येष्ठांचाही आशीर्वाद-निलेश लंके; निघोजला प्रचारसभा

माझ्या पाठिशी ज्येष्ठांचाही आशीर्वाद-निलेश लंके; निघोजला प्रचारसभा

Next

पारनेर :  माझ्याबरोबर टुकार मुले फिरतात अशी टीका करून तरुणांना बदनाम केले जात आहे. या तरुणांसह  माझ्या पाठिशी ज्येष्ठांचाही आशीर्वाद आहे. तरुणांची ताकद काय असते ते या निवडणुकीत दिसेल. पारनेर मतदारसंघात परिवर्तनाची लाट नव्हे,  तर त्सुनामी आली आहे, अशी टीका पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी केली.
निघोज जिल्हा परिषद गटाच्या प्रचाराचा शुभारंभ माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड, माजी सभापती मधुकर उचाळे, प्रभाकर कवाद, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, गांजीभोयरेचे सरपंच डॉ. आबासाहेब खोडदे, संपदा पतसंस्थेचे संस्थापक रामभाऊ डेरे, माजी पंचायत समिती सदस्य किसनराव रासकर, अ‍ॅड. बाळासाहेब लामखडे, सोमनाथ वरखडे, अनंतराव वरखडे, ठकाराम लंके, शिवाजी औटी, चंद्रकांत कावरे, माजी उपसभापती नानाभाऊ वरखडे, सुभाष खोसे, उपसरपंच दादाभाऊ पठारे, ज्ञानदेव पाडुळे, बबलू रोहकले, विक्रम कळमकर, निवृत्ती गाडगे आदी उपस्थित होते.
लंके म्हणाले, लोकप्रतिनिधींनी ज्या मायबाप जनतेच्या जीवावर पंधरा वर्षे राजकारण केले. सत्ता भोगली. त्या मायबाप जनतेच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मी निवडणुकीला उभा आहे. तालुक्यातील पाणी, बेरोजगारी व शिक्षण आदी  प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी सांगितले. दादाभाऊ कळमकर म्हणाले, सामान्य जनतेच्या कुठल्याही सुख दु:खात सहभागी न होता केवळ विकासाच्या गप्पा मारणारे लोकप्रतिनिधी पारनेरच्या जनतेला कुकडीचे पाणी हवे होते, तेव्हा कुठे होते? त्यामुळे कुकडीच्या पाण्याचे राजकारण करणा-या लोकप्रतिनिधींना घरी बसवा, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन अ‍ॅड. बाळासाहेब लामखडे यांनी केले. सोमनाथ वरखडे यांनी आभार मानले.

Web Title: Blessings of my late senior-Nilesh Lanka; Neighborhood Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.