भाजपतर्फे  जिल्ह्यात १४ ते २३ सेवा सप्ताहाचे आयोजन - प्रसाद ढोकरीकर यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 12:04 PM2020-09-16T12:04:07+5:302020-09-16T12:05:10+5:30

जामखेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस याचप्रमाणे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगर जिल्ह्यामध्ये १४ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीमध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  या सात दिवसांमध्ये नगर जिल्ह्यातील आठही मंडलमध्ये विविध कार्यक्रम  आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संघटन सरचिटणीस व सेवा सप्ताहचे जिल्हा प्रभारी प्रसाद ढोकरीकर यांनी दिली. 

BJP organizes 14 to 23 service weeks in the district - Information by Prasad Dhokrikar | भाजपतर्फे  जिल्ह्यात १४ ते २३ सेवा सप्ताहाचे आयोजन - प्रसाद ढोकरीकर यांची माहिती 

भाजपतर्फे  जिल्ह्यात १४ ते २३ सेवा सप्ताहाचे आयोजन - प्रसाद ढोकरीकर यांची माहिती 

Next

जामखेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस याचप्रमाणे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती व राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगर जिल्ह्यामध्ये १४ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर या कालावधीमध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  या सात दिवसांमध्ये नगर जिल्ह्यातील आठही मंडलमध्ये विविध कार्यक्रम  आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हा संघटन सरचिटणीस व सेवा सप्ताहचे जिल्हा प्रभारी प्रसाद ढोकरीकर यांनी दिली. 

भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगर जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांच्या आयोजनात संदर्भात जिल्हा संघटन सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर यांनी लोकमतशी माहिती देताना सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी आहे ,तर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती २५ सप्टेंबर रोजी आहे आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोंबर रोजी आहे या तीनही कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगर जिल्ह्यातील राहुरी पाथर्डी शेवगाव कर्जत-जामखेड नगर श्रीगोंदा व पारनेर या आठ मंडळांमध्ये पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी करोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवून व सर्व नियमांचे पालन करून सेवा सप्ताह पाळणार आहेत .

 श्री ढोकरीकर यावेळी पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७० वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने ७० कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक मंडलामध्ये सत्तर दिव्यांगांना विविध प्रकारचे कृत्रिम अवयव आणि उपकरणे यांचे वाटप करण्यात येणार आहे. 

 ७० गरीब बंधू-भगिनींना आवश्यकतेनुसार चष्मा देण्यात येणार आहे याचप्रमाणे ७० गरीब वस्त्यांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये सर्व नियमांचे पालन करून फळांचे वाटप करण्यात येणार आहे याचप्रमाणे सत्तर नागरिकांना स्थानिक गरजेनुसार रुग्णालयाच्या माध्यमातून करोना च्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते क्लास करणार आहेत. 

शिवाय युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे याशिवाय प्रत्येक बूथ मध्ये ७० वृक्षांची लागवड करून पर्यावरण रक्षणाचा संकल्प भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करणार आहेत याशिवाय जिल्ह्यांमधून सत्तर गावामध्ये स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे यावेळी प्लास्टिक मुक्तीचा संकल्प भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी करणार आहेत याशिवाय पक्षाच्या जिल्ह्यातील मुख्यालयाच्या ठिकाणी स्वच्छतेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

     पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची २५ सप्टेंबर रोजी जयंती आहे पक्षाला विचारधारा प्रदान करणारे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक बुथवर सहा राष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले

आहे या दिवशी पंडित दीनदयाळ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले जाणार आहेत याप्रमाणे पक्षाचे सर्व बुथ प्रमुख या दिवशी आपल्या घरावर पक्षाचा झेंडा लावणार आहेत याशिवाय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून पंडित दीनदयाळ यांची जयंती साजरी करण्यात येणार असल्याचे प्रसाद ढोकरीकर यांनी सांगितले.

ReplyForward

  

Web Title: BJP organizes 14 to 23 service weeks in the district - Information by Prasad Dhokrikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.